Monsoon Special Recipes  SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Special Recipes : जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन! घरीच बनवा दही मिरची, जाणून घ्या रेसिपी

Shreya Maskar

पावसात आपल्याला अनेक चटपटीत गरमागरम पदार्थ खायला आवडतात. वरण, भात, भाजी, पोळी अशी पारंपरिक थाळी असली तरी याची चव वाढवण्यासाठी आपण चटणी, कोशिंबीर, लोणचे इत्यादी पदार्थ खातो. हे पदार्थ तोंडी लावायला चवदार लागतात.

पावसाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन म्हणजे चटपटीत कुरकुरीत दही मिरची होय. या मिरचीची पाकीटे बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतात. पण पावसात बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच बनवा साध्या सोप्या पद्धतीने दही मिरची. यामुळे जेवणाची मजा अजून खुलेल.

साहित्य

चटपटीत दही मिरची बनवण्यासाठी खालील गोष्टी लागतात.

कृती

पावसाळ्यात चटपटीत दही मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धूवून उभ्या कापाव्यात. दही मिरची बनवण्यासाठी जास्त तिखट मिरची घेणे टाळावे. दही मिरची बनवण्यासाठी घट्ट आंबट दह्याचा वापर करावा. एका भांड्यात दही, मीठ, हिंग, हळद, धने- जिरे पूड, दाण्याचा कूट, बारीक चिरलेली लसूण घालून सर्व मिश्रण चांगल फेटून घ्यावे. मिरचीला चारी बाजूंनी सारण लागेल याची काळजी घ्यावी. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवून द्या. मिरचीमध्ये दही छान मुरू द्या. त्यानंतर या मिरच्या उन्हामध्ये किंवा पंख्याखाली वाळवायला ठेवा. त्यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये प्लास्टिक पसरवून त्यावर हे सारण वाळवायला टाका. मिरची संपूर्ण वाळल्यावर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या. जेव्हा मिरच्या खायच्या असतील तेव्हा मंद आचेवर गरम तेलात छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे जेवणात तोंडी लावायला दही मिरची तयार झाली. या पद्धतीने बनवलेली दही मिरची वर्षभर टिकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Scrub: चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हा' स्क्रब करा ट्राय...

Marathi News Live Updates : पंढरपूरजवळ धावत्या शिवशाही बसला आग, प्रवाशांची धावपळ

Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT