Crimean-Congo Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Crimean-Congo Disease : कोरोनापेक्षाही भयंकर! या विषाणूच्या संसर्गामुळे डोळ्यांतून होतो रक्तस्राव, तज्ज्ञांचा दावा

Crimean-Congo Symptoms : पुन्हा एका संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळे लाल होऊन यातून रक्त वाहू लागते.

कोमल दामुद्रे

Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF :

मागच्या तीन वर्षापासून जागतिक स्तरावर कोरोना माहामारीचा धोका आजही कायम आहे. अशातच पुन्हा एका संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळे लाल होऊन यातून रक्त वाहू लागते.

या आजाराला क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाची लाट (Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF)म्हणून ओळखले जात आहे. सध्या याबाबत युरोपीयन देशांमध्ये चर्चा देखील सुरु आहे. अनेक तज्ज्ञांचा असे मत आहे की, हा आजार लवकरच ब्रिटनमध्ये पसरु शकतो. फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विषाणू सर्वात आधी उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेजवळील पाइरेनीस ओरिएंटेल्स किटकांमध्ये आढळून आला आहे. मात्र याचा संसर्ग अद्यापह कोणाला झालेला नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या संसर्गजन्य विषाणूची माहिती डेली मेलच्या अहवालात म्हटले आहे. या प्राणघातक विषाणूचे घटक जिवंत टिक्स, पिरेनेस ओरिएंटेल प्रदेशातील गुरांमधून गोळा केले गेले. तज्ज्ञांच्या मते क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाचा संसर्ग किड्याच्या माध्यमातून होऊ शकतो. हा किडा आफ्रिका, बाल्कन, मध्य-पूर्व आशिया आणि आशियामधील उष्ण प्रदेशात पाणी आणि हवेमार्फत पसरत आहे. WHO च्या मते हा संसर्ग अधिक जुना असून यामध्ये ४० टक्के लोक दगावण्याची शक्यता आहे.

1. सर्वाधिक धोका फ्रान्सला

जुलै महिन्यात ब्रिटीश तज्ज्ञांनी ग्लोबल वॉर्मिंगमार्फत या विषाणूच्या संसर्गाचा इशारा दिला होता. हा संसर्गजन्य आजार ग्लोबल वॉर्मिंगमुळे पसरेल असे म्हटले आहे. याचा सर्वाधिक धोका हा युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सला या देशांना असू शकतो. २०१६ ते २०२२ दरम्यान या विषाणूचे स्पेनमध्ये संसर्ग झालेले ७ रुग्ण आढळून आले. यापैकी ३ रुग्णांचा मृत्यू देखील झाला.

2. या आजाराची लक्षणे कोणती?

सुरुवातीच्या काळात हा इबोलासारखी याची लक्षणे दिसतात. संक्रमित व्यक्तींचे स्नायू दुखणे, ओटीपोटीत दुखणे, घसा खवखवणे आणि उलट्या होऊ शकतात. हा आजार (Disease) जसजसा वाढेल तसतसा डोळ्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो. विशेषत: यामध्ये नाकातून किंवा डोळे आणि त्वचेतील केशिका तुटल्यामुळे असे होऊ शकते. इतर लक्षणांमध्ये (Symptoms) ताप, चक्कर येणे, मानदुखी (Neck Pain), पाठदुखी, डोकेदुखी, डोळे दुखणे आणि प्रकाश सहन न यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT