हिवाळा सुरु झाला की, अनेक सर्सगजन्य आजार होण्याची शक्यता असते. वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. या ऋतूमध्ये अनेकांना आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते.
या काळात स्रियांच्या पायांना भेगा पडतात. कडाक्याची थंडी किंवा पाण्यात सतत काम केल्याने त्वचा खराब होते. पाय मऊ होण्याऐवजी ते अधिक कडक होतात. पण वर्षभर तुमच्या पायाला सतत भेगा पडत असतील तर त्याचे कारण काय? अशावेळी आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टाचांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास रक्तस्त्राव सुरु होतो आणि त्यानंतर आपल्याला चालण्यासही त्रास होतो. ज्या लोकांना या समस्येचा त्रास होतो त्यांनी या समस्येकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. या जीवनसत्त्वांची शरीरात कमतरता झाल्यास आरोग्यावर (Health) परिणाम होतो.
जीवनसत्त्व (Vitamins) ई, बी३ आणि सी च्या कमतरतेमुळे वर्षभर आपल्या टाचांना भेगा पडतात. इतकेच नाहीतर ज्या लोकांमध्ये या जीवनसत्त्वांची कमतरता असते त्यांच्या शरीराची संपूर्ण त्वचा (Skin) ही निर्जीव आणि कोरडी पडते.
या जीवनसत्त्वांमुळे आपल्या शरीरात योग्य प्रमाणात कोलेजन तयार होते, ज्यामुळे शरीराच्या त्वचेला योग्य पोषण मिळते. त्यामुळे ही जीवनसत्त्व आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाची असतात.
1. या जीवनसत्त्वांची कमतरता
जीवनसत्त्व ई च्या कमतरतेवर मात करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, किवी, आंबा, कडधान्य, सूर्यफूल बिया, ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणे आणि बदाम यांचे सेवन करावे.
जीवनसत्त्व बी ३ च्या कमतरेवर मात करण्यासाठी मासे, चिकन, ब्राऊन राइस, नट आणि बिया, शेंगा, केळी आणि रेड मीट याचे सेवन करायला हवे.
जीवनसत्त्व क च्या कमरतेवर मात करण्यासाठी लिंबू आणि संत्री इत्यादी पदार्थांचे सेवन करायला हवे.
2. कशी घ्याल टाचांची काळजी?
रात्री झोपण्यापूर्वी टाचांना पेट्रोलियम जेली लावा. ज्यामुळे पायांना आराम मिळेल.
मोहरीच्या तेलात मेथी दाणे घालून गरम करा. थंड झाल्यानंतर टाचांवर लावा.
खोबऱ्याच्या तेलात कोरफड जेल मिक्स करुन पायांच्या टाचांवर लावा. फरक जाणवेल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.