Weight Loss Tips : स्लिम-ट्रिम दिसायचे आहे? वाढत्या वजनावर असे ठेवा नियंत्रण, डाएटमध्ये करा या सूपरफूडचा समावेश

How To Control Weight : वाढत्या वजनामुळे हल्ली बरेचजण त्रस्त आहेत. यामध्ये लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. वजन कमी करण्याच्या या काळात आपल्याला अनेक पदार्थांना सोडून द्यावे लागते.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv
Published On

Weight Loss Superfood :

फूडी लोकांना वजन कमी करणे सगळ्यात कठीण असते. वाढत्या वजनामुळे हल्ली बरेचजण त्रस्त आहेत. यामध्ये लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. वजन कमी करण्याच्या या काळात आपल्याला अनेक पदार्थांना सोडून द्यावे लागते.

खाण्यापिण्याच्या या सवयींचा थेट तुमच्या मूडवरही परिणाम होतो. नवीन वर्षात अनेकांनी वजन कमी करण्याचे ध्येय ठरवले असेल. परंतु, या काळात आपण अशा अनेक चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जर तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर या सूपरफूडचा आहारात समावेश करा.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. रताळे

रताळे हे अतिशय फायदेशीर असून वजन कमी करण्यासाठी याचे सेवन शरीरासाठी उपयुक्त ठरते. याला फायबरचा खजिना म्हणून ओळखले जाते. शरीरासाठी फायबर हे आवश्यक आहे. याचे सेवन केल्यास वजन कमी (Weight Loss Tips) करण्यास मदत होईल.

Weight Loss Tips
Bad Habits : या ९ वाईट सवयींमुळे तुम्ही होणारचं नाही Slim

2. बदाम

सकाळीची सुरुवात बदाम खाऊन कोमट पाण्याने (Water) करा. भिजवलेले बदाम सर्वात फायदेशीर आहेत. बदामात असणारे घटक शरीरासाठी पौष्टिक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहाते.

3. दही

दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश केल्याने अन्नपचन लवकर होते. तसेच यासोबत दही पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. यामुळे वजन लगेच कमी होण्यास मदत होईल.

Weight Loss Tips
Weight Loss Breakfast : हिवाळ्यात सतत भूक लागते? ट्राय करा नाचणी-ओट्सचा ढोकळा, वाढते वजनही राहिल नियंत्रणात

4. मुगाची डाळ

मुगाची डाळ स्प्राउट्स स्वरुपात खाल्ल्याने फायदा (Benefits) होईल. यामध्ये तुम्ही चीला, इडली किंवा त्यापासून इतर अनेक पदार्थ बनवून चव चाखू शकता. तसेच यात फायबरचा खजिना अधिक असतो.

5. अंडी

वजन कमी करायचे असेल तर आहारात अंड्यांचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. दररोज २ ते ३ अंडी खाल्ल्याने तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहिल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com