Covid Study Saam Tv
लाईफस्टाईल

Covid Study : कोरोनामुळे भारतीयांच्या फुफ्फुसांचं सर्वाधिक नुकसान, जगभरातील संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

कोमल दामुद्रे

Covid-19 Affect Lung Health :

२०१९ साली कोरोनाने चीनमध्ये थैमान माजवले. त्यानंतर हा रोग हळूहळू देशभरात पसरला. कोरोनाच्या काळात अनेकांना हृदयविकार, फुफ्फुसांच्या आजारांचा सामना करावा लागला. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे भारतीयांच्या फुफ्सांचं सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, कोविडमधून बरे झालेल्या भारतीयांपैकी (India) अधिक प्रमाणात फुफ्फुसाचे कार्य कमी झाले आहे. युरोपियन आणि चिनी लोकांपेक्षा याचे सर्वाधिक प्रमाण हे भारतीयांमध्ये दिसून आले.

संशोधनात त्यांनी असे देखील म्हटले की, काही लोक वर्षाभरात पूर्वस्थिती येऊ शकतात. पण काहींना हा फुफ्फुसांचा त्रास हा आयुष्यभर राहू शकतो. फुफ्फुसाच्या कार्यावर SARS-CoV-2 च्या प्रभावाची तपासणी करणारा हा देशातील सर्वात मोठा अभ्यास असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अभ्यास २०७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर हा अभ्यास PLOS ग्लोबल पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सौम्य, मध्यम आणि गंभीर स्वरुपाची फुफ्फुसांची लक्षणे (Symptoms) पाहायला मिळाली. यामध्ये रुग्णांना फुफ्फुसाच्या कार्य चाचण्या, सहा मिनिटे चालण्याची चाचणी, रक्ताची चाचणी याचे मूल्याकंन केले.

1. फुफ्फुसांचे अधिक नुकसान

TOI ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार फुफ्फुसाची कार्य चाचणी म्हणजे गॅस ट्रान्सफर (DLCO), जी इनहेल्ड हवेतून रक्तप्रवाहात ऑक्सिजन मोजण्याची क्षमता असते. ज्यामुळे ४४ टक्के लोक प्रभावित होतात. ज्याला CMC डॉक्टरांनी चिंताजनक म्हटले आहे. यात ३५ टक्के लोकांना फुफ्फुसाचा आजार (Disease) होता. ज्यामुळे श्वास घेताना फुफ्फुसांच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच ८.३ टक्के लोकांना अडथळा आणणारा फुफ्फुसांचा आजार होता. ज्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होताना दिसून आला.

2. ९५ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचे नुकसान

TOI च्या वृत्तानुसार सध्या फुफ्फुसांच्या नुकसानामध्ये भारतीय रुग्णांची स्थिती वाईट आहे. तसेच फुफ्फुसांच्या नुकसानाशिवाय मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा देखील सामना करावा लागतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT