COVID-19  Saam Tv
लाईफस्टाईल

COVID-19 : प्रेग्नेंसीच्या काळात 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका, आई आणि बाळाला होऊ शकते संक्रमण !

COVID-19 चा परिणाम सध्या महिलांवर अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

COVID-19 : कोरोना माहामारीने पुन्हा नव्याने डोके वर काढण्यास सुरु केले आहे. याचा प्रभाव इतका वेगवान आणि प्रभावी आहे की, कोणतीही व्यक्ती, कोणत्याही परिस्थितून लवकर बाहेर येत नाही. याचा परिणाम सध्या महिलांवर अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

गर्भवती महिलांनी कोरोना काळात जास्त काळजी घ्यावी. मात्र, या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गर्भधारणेदरम्यान महिलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांना किती धोक्याचा सामना करावा लागतो.

1. गर्भवती महिलांना कोरोनाचा धोका कसा होतो?

गर्भवती महिलांमध्ये कोरोनाच्या (Corona) जोखमीबाबत, राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या कार्यक्रम सल्लागार समितीचे अध्यक्ष, संचालक प्राध्यापक आणि प्रमुख औषधी मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, दिल्लीचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. सुनिला गर्ग यांनी टिव्ही 9 शी संपर्क साधला. त्या म्हणतात, आपल्या देशात बहुतेक लोक लसीकरण करतात. जेव्हा एखाद्या महिलेला गर्भधारणेदरम्यान कोविड 19 ची लागण होते तेव्हा हे खूप सामान्य आहे. मात्र या काळात त्यांनी स्वत:ची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

गरोदरपणात महिलांनी त्यांच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिले पाहिजे. यासाठी हात नेहमी स्वच्छ ठेवा, मास्क लावा आणि चेहऱ्याला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू नका. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

pregnant lady precautions during covid

2. कोरोनाची लागण झाल्यावर काय करावे?

  • डॉ.सुनीला गर्ग यांनी सांगितले की, जर गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली तर घाबरण्याचे कारण नाही.

  • या दरम्यान महिलांनी कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करावे.

  • यामध्ये महिलांनी (Women) प्रथम कोरोना चाचणी करून घ्यावी आणि जर ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर स्वत:ला 14 दिवस क्वारंटाइन करा.

  • याशिवाय, डॉक्टरांशी नियमित संपर्क ठेवा आणि शक्य तितकी स्वतःची काळजी घ्या.

3. आहाराची काळजी घ्या

  • गर्भवती महिलांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आहाराची पूर्ण काळजी घेणे. त्यांना अशक्तपणा वाटू नये.

  • गरोदरपणात महिलांनी प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खावेत, ज्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT