Corona JN.1 Variant Saam Tv
लाईफस्टाईल

Corona JN.1 Variant : कोरोनाचा नवा JN.1 व्हेरिएंट किती घातक? लक्षणे कसे ओळखाल आणि काळजी कशी घ्याल?

Corona JN.1 Variant Precautions : कोरोना JN.1 कसा होतो? त्याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया सविस्तर कोरोना विषाणूने पुन्हा एकादा भारतात एन्ट्री केली आहे. केरळमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

कोमल दामुद्रे

Corona JN.1 Variant Symptoms :

कोरोना विषाणूने पुन्हा एकादा भारतात एन्ट्री केली आहे. केरळमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशातच मुंबईमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात आज कोरोनाचे १३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा सरकारने सर्तकतेचे पाऊल उचलले आहे. अशातच कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट जेएन १ भारतात आढळल्यामुळे केंद्रिय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पत्र पाठवले. कोरोना JN.1 कसा होतो? त्याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया सविस्तर

नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड (Covid) टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांच्या मते, हा कोरोना व्हेरिएंट पसरण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती टाळणारा असेल. ज्यांना यापूर्वी कोविड झाला आहे किंवा लस घेतलेल्यांना देखील संक्रमण होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या (Corona) सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, नाक गळणे, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी यासारखी लक्षणे (Symptoms) दिसून येतात. तसेच यामध्ये जठरोगाविषयी देखील लक्षणांचा समावेश दिसून आला आहे.

या लक्षणांची लागण झाल्यास पचनासंदर्भातील समस्या अधिक प्रमाणात वाढताना दिसून आला आहे. परंतु, मिळालेल्या माहितीसाठी जेएन १ अधिक घातक असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही असे मत अमेरिकेतील केंद्राने स्पष्ट केले आहे.

साधारणत: ४ ते ५ दिवसात लक्षणे सुधारतात. यामध्ये रुग्णांना श्वास घेण्यास अडचण येते. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टिसिंग ठेवणे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

1. सगळ्यात पहिला कुठे आढळला Corona JN.1 Variant ?

केरळमधील तिरुवनंतरपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील ७८ वर्षीय महिलेमध्ये Corona JN.1 Variant आढळून आला होता. हा ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या पिरोलापासून तयार झाला आहे असे म्हटले जाते. स्पाइक प्रोटीनमुळे शरीरामध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT