Diwali 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Diwali 2024 : कुरकुरीत आणि टेस्टी फक्त १५ मिनिटांत तयार होणारा मक्याचा चिवडा; घरच्याघरी कसा बनवाल?

Corn Chivda Recipe : दिवाळीसाठी घरच्याघरी मक्याचा चिवडा कसा बनवायचा याची परफेक्ट रेसिपी आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

या महिन्याच्या २९ तारखेपासूनच दिवाळीला सुरूवात होत आहे. यंदा दिवाळी फार लवकर आली आहे. त्यामुळे सर्वत्र या सणानिमित्त फराळाचे पदार्थ बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिवाळीच्या फराळात सर्व पदार्थ गोड असतात. त्यामुळे प्रत्येकाला तिखट म्हणून चकल्या आणि चिवडा खावासा वाटतो. त्यामुळेच आज मक्याचा चिवडा घरच्याघरी कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

मक्याच्या लाह्या - ४ वाटी

शेंगदाणे - १ वाटी

कढीपत्ता - १ वाटी

बडीशेप - ५ चमचे

धणे - ५ चमचे

साखर - २ चमचे

तेल - आवश्यकतेनुसार

मिरची - १ वाटी

चण्याची डाळ - २ वाटी

रामबंधू चिवडा मसाला - १ पाकीट

खोबरं - २ वाटी

काजू - २ वाटी

बदाम - २ वाटी

मणूके - २ वाटी

कृती

सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घ्या. तेल छान गरम झालं की त्यात आधी शेंगदाणे मस्त खरपूस तळून घ्या. शेंगदाणे तळून झाले की, सुक्या खोबऱ्याचे बारीक काप करून घ्या. त्यानंतर चण्याची डाळ देखील तळून घ्या. चण्याची डाळ तळून झाली की त्यात कढीपत्त्याची पाने तळून घ्या. तसेच मिरची बारीक चिरा आणि ती देखील तळून घ्या. एका तुसऱ्या पॅनमध्ये धने आणि बडीशेप भाजून घ्या.

सर्व साहित्य तळून झाले की शेवटी काजू, बदाम आणि मणूके सुद्धा तेलात तळा. तसेच शेवटी मक्याच्या लाह्या तेलात तळून घ्या. मक्याच्या लाह्या तेलात टाकल्यावर लगेचच फुलतात आणि मोठ्या होतात. त्यामुळे कढईचा अंदाज घेऊन थोड्या थोड्या लाह्या तळा. कारण जास्त लाह्या एकाचवेळी टाकल्यास त्या करपण्याची शक्यता असते.

लाह्या तळून झाल्या की यामध्ये अगदी थोडी पिठी साखर मिक्स करा. पिठी साखर मिक्स केल्यावर अन्य सर्व तळलेल्या गोष्टी मिक्स करा. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. तसेच पुढे यात रामबंधू मसाला सुद्धा मिक्स करा. अशा पद्धतीने तयार झाला मक्याचा खमंग आणि कुरकुरीत चिवडा. हा चिवडा महिनाभर सुद्धा चांगला राहतो आणि खराब होत नाही.

चिवडा तयार झाल्यावर तुम्ही यात तुमच्या चवीनुसार मिठ मिक्स करू शकता. चिवड्यात मिरची असल्याने यात मिठाची आवश्यकता असते. रामबंधू चिवडा मसाल्यात देखील थोडे मीठ असते. त्यामुळे त्याची चव चाखल्यानंतरच मिठाचा वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: रिषभ पंतवर लागली रेकॉर्डब्रेक बोली! या संघाने लावली २७ कोटींची बोली

Maharashtra Politics : विधीमंडळात विरोधी पक्षनेतेपद असणार का? घटनातज्ज्ञांना काय वाटतं? वाचा

IPL 2025 Mega Auction: श्रेयस अय्यरने इतिहास रचला! लागली IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

Sanjay Kelkar News : ठाण्याच्या विकासासाठी लवकरच पुढचं धोरण ठरवणार; संजय केळकरांनी मानले मतदारांचे आभार

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

SCROLL FOR NEXT