ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच गोड पदार्थ आवडत असतात.
तुमच्या याच आवडीकडे लक्ष देत आज तुमच्यासाठी एक चविष्ट कपकेकची रेसिपी घेऊन आलो आहोत.
कपकेकची रेसिपी अगदी सोपी असल्याने तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता.
मैदा, पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा, बटर, कंडेस मिल्क इत्यादी
सर्व प्रथम एक बाउल घ्या. त्यामध्ये मैदा, पिठी साखर, कोको पावडर, आणि बटर अॅड करा. नंतर त्यात बेकिंग सोडा आणि खाण्याचा सोडा अॅड करुन चांगले मिक्स करुन घ्या.
दुसऱ्या स्टेपमध्ये त्या मिश्रणात कंडेस मिल्क टाकून चांगले एकजीव करुन घ्या. नंतर या सर्व मिश्रणाचे चांगले बॅटर तयार करुन घ्या. नंतर तुमच्या आवडीचा कोणत्याही आकाराचा केकचा साचा घ्या.
कपकेकच्या साच्यात तयार केलेल सर्व बॅटर टाकून घ्या. नंतर गॅस ऑन करुन त्यावर कुकर ठेवा. मग त्या कुकरमध्ये एक रिंग ठेवून कपकेकचे बॅटर ठेवा.
यानंतर कुकरचे झाकण लावून कपकेकला ५-६ मिनिटे शिजवून घ्या. अशाप्रकारे आपला स्वादिष्ट कपकेक तयार झाला आहे. तुम्ही कपकेकला चॅाकलेट सिरप आणि क्रीमने सजवू शकता.
NEXT: यंदाची कोजागिरी पौर्णिमा होईल खास; घरच्या घरी बनवा मखाणा बासुंदी