Saam Tv
यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेला काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा आहे? चला करुया स्पेशल डीश ट्राय
मखाणा खाण्याचे फायदे खूप कमी लोकांना माहिती आहे. मखाणा हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे.
तुम्ही 'मखाण्याची बासुंदी' तयार करु शकता. याचे सेवन तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा करु शकता.
२ कप मखाने, २ चमचे तूप, १ लीटर दूध, १ चमचा वेलची पूड, १/२ वाटी काजू-बदाम, ७-८ केशराच्या काड्या इ.
सर्वप्रथम दूध नॉनस्टिक पॅनमध्ये स्लो फ्लेमवर गरम करायला ठेवा. दूध अर्धे होईपर्यंत उकळवून घ्या.
दुसऱ्या बाजुला कढईत तूप घालून मखाणे कुरकरीत होईपर्यंत ३-४ मिनिट भाजून घ्या.
आटलेल्या दूधात साखर, केशराच्या काड्या, वेलची पावडर, काजू-बदाम आणि भाजलेले मखाणे व्यवस्थीत एकत्र करुन घ्या.
ड्रायफ्रुट्स एकत्र केल्यावर काही वेळ पुन्हा दुधाला उकळी येऊ द्या. यावर शक्यतो झाकण ठेवू नये.
दूध जाडसर झाल्यावर गॅस बंद करा आणि स्वादिष्ट डिश सर्व करा.