Siddhi Hande
सर्वांनाच चाट खायला खूप आवडते.त्यात दाबेली हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा असतो.
दाबेलीचा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम तेल गरम करा. त्यात कश्मिरी लाल मिरची, हळद पावडर, धने पावडर, मीठ आणि दाबेल मसाला टाका.
हे मसाले चांगले भाजून घ्या. त्यात पाणी टाका. ते चांगले उकळून घ्या.
यानंतर बटाटे शिजवून घ्या. बटाटे या मिश्रणात टाका.
यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करा. त्यात इमली चटणी आणि मसाला शेंगदाणे टाका.
यानंतर एका पावाला मधून ओपन करा. त्यात इमली चटणी, लसूण चटणी टाका.
त्यानंतर दाबेलीचे स्टफिंग टाका. त्यावरुन चिरलेला कांदा आणि मसाला शेंगदाणे टाका.
यानंतर ही दाबेली तव्यावर बटरमध्ये चांगली भाजून घ्या.