Best Bottle For Drinking Water GOOGLE
लाईफस्टाईल

Copper Vs Glass Bottle Health: तांब्याच्या की काचेच्या बाटलीतील पाणी चांगलं? तुमच्या-आमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल

Best Bottle For Drinking Water: तांब्याच्या आणि काचेच्या बाटलीतील पाण्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतो. दोन्हींचे फायदे-तोटे काय आहेत, तज्ज्ञ काय सांगतात आणि आरोग्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे ते जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

पाणी आपल्या शरीराची गरज असते. पाणी प्यायलं नाही की आपल्याला बऱ्याच मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातच आता उन्हाळा सुरु होत आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला सतत जबरदस्ती पाणी पिण्याची गरज नसते. कारण तुम्हाला आपोआप तहान लागत असते. डॉक्टरही या दिवसात जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीये का, तांब्याच्या की काचेच्या बाटलीतील पाणी चांगलं? याने शरीरावर खरंच काही परिणाम होतो का? लोकांना या फक्त अफवा वाटतात का? यासगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

उन्हाळ्यात लोक प्रवास करताना बऱ्याचदा १ पाण्याची बाटली सोबत ठेवतात. या दिवसात खूप तहान लागते किंवा काहींना उन्हामुळे चक्कर येऊ शकते. त्यामुळे ही सवय खूप चांगली असते. पण पाण्याची कोणती बाटली म्हणजे तांब्याची की काचेची चांगली? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. कारण प्लास्टिकच्या बाटल्या लोक प्रवासात वापरत नाहीत. कधीकधी त्यातून पाणी पिणंच टाळतात.

काही लोक प्रवासातसोबत थंड पाणी घेऊन जाणं पसंत करतात. कारण उन्हात फिरल्यावर थंड पाण्याने त्यांना लगेचचं बरं वाटतं. हे पाणी काचेच्या किंवा तांब्याच्या दोन्ही बाटल्यांमध्ये व्यवस्थित थंड राहतं. पण तांब्याच्या बाटलीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. कारण घरच्या मोठ्यांच्या म्हणण्यानुसार तांब्यात साठवलेलं पाणी शरीरासाठी चांगलं असतं. तर तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. पण याची दुसरी बाजू म्हणजे यामध्ये संतुलन तुम्ही एक मर्यादा ठेवली पाहिजे. कारण शरीरात तांब्याचं प्रमाण जास्त झाल्यावर पोटदुखी, मळमळ किंवा इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तसेच काचेच्या बाटल्या पाणी पिण्यासाठी चांगल्या मानल्या जातात. काचेत कोणताच रासायनिक घटक नसतो. आणि पाण्याच्या चवीवरही त्याचा परिणाम होत नाही. काच नॉन-पोरस आणि रासायनिकदृष्ट्या स्थिर असते. त्यामुळे काचेच्या बाटलीत पाणी नेहमी स्वच्छ आणि ताजं राहतं. काचेच्या बाटल्या स्वच्छ करणं हे सोपं नसतं. या बाटल्या बरेच दिवस टिकतात.

तांब्याच्या बाटल्यांबद्दल लोकांना असं वाटतं की, तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी कोणत्याही आजारावर रामबाण उपाय ठरतं, पण अशा दाव्यांना पुरेसा वैज्ञानिक आधार नाही, असे तज्ज्ञ सांगतात. पाणी काही तास किंवा रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवणं पुरेसं असतं. त्यामुळे शरीरात तांब्याचं जास्त प्रमाण जाण्याचा धोका कमी होतो आणि संभाव्य फायदेही मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाण्याच्या बाटली निवडू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महापौरांच्या कारवरील लाल दिवे काढण्यात आले

Bullet Train: 'मेड इन इंडिया' बुलेट ट्रेन लवकरच धावणार, तिकिटाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर, वाचा सविस्तर

Instagram युजर्सच्या कामाची बातमी! आता चॅट्सची प्रायव्हसी संपणार, मेटानं घेतला मोठा निर्णय

Pudina Storing Tips: पुदीना महिनाभर फ्रेश राहण्यासाठी काय करावे?

Viral Video: ऑटोवाला दिवसाला ७५ हजार कमावतो? त्या व्हायरल व्हिडिओनंतर सर्वांनाच बसला धक्का, पण नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT