VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

cjp founder abhijeet dipke latest statement : विद्यार्थ्यांचा छळ थांबवला नाही तर, पुन्हा आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार करतानाच, आता त्रास देत राहिले तर थेट सरकार बदलतील, असा इशाराच अभिजीत दिपकेंनी दिला.

Abhijeet Dipke says students can change the government : कॉक्रोच जनता पार्टीची (CJP) स्थापना केल्यानंतर अमेरिकेतून भारतात आलेला अभिजीत दिपके जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला यश आल्यानंतर ४० दिवसांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी परतला आहे. विद्यार्थ्यांचा छळ पोलिसांकडून होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगून तो त्रास असाच कायम राहिला तर, पुन्हा आंदोलन करू, असा इशारा दिपकेंनी काल, मंगळवारी सरकारला दिला होता. तोच इशारा पुन्हा त्यानं सरकारला दिला आहे.

जवळपास ४० दिवसांनी आणि दीर्घ संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो आहे. ३६ दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन केले. त्या मेहनतीला यश आलं. देशातील विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. खूप आनंद झाला आहे, असे दीपके म्हणाले.

सरकारने सुधारावे, २० जुलैला दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांचे रक्त वाहिले. ते अत्यंत वाईट होते. तरीही तुमचे मन भरले नसेल म्हणून अजूनही तुम्ही वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पोलीस त्रास देत आहेत. त्यांना अटक आणि ताब्यात घेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे विद्यार्थी दहशतवादी नाहीत. ते देशाचे भविष्य आहेत. हे सरकार देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांना असेच त्रास देत असेल तर, या विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. आता जर सरकार ताळ्यावर आले नाही तर हे सरकारही ते बदलतील, असा इशारा दिपकेंनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com