Diabetes Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Tips : ब्लड शुगरला आटोक्यात आणण्यासाठी सेवन करा 'या' 5 पानांचे, मधुमेहांसाठी तर बहुगुणी !

Diet Plan For Diabetes : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

कोमल दामुद्रे

Leaves For Diabetes : मधुमेह आरोग्याचे योग्य काळजी घेणे खूप गरजेचे असते. या रोगामुळे त्यांना इतर आजारांचा देखील सामना करावा लागतो त्यामुळे त्यांचे योग्य जीवनशैली असणे आवश्यक असते.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते त्यासाठी त्यांनी योग्य आहार फॉलो करून ब्लड लेवल शुगर कंट्रोल मध्ये आणू शकतात. तसेच त्यांच्या आहारात या काही पानांचा समावेश करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतात.

तुमच्या रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण वाढत असेल तर तुम्ही या पानाच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. याने तुमच्या आरोग्यालाही (Health) त्याचा फायदा होईल चला तर मग जाणून घेऊया या पानांविषयी माहिती.

1. आंब्याची पाने

Mango leaves

आंब्याच्या पानाचा उपयोग करून तुम्ही रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. आंब्याच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म आढळतात त्यामुळे याने तुमच्या आरोग्य सुधारण्यास मदत होईल. फायबर,पेक्टीन, व्हिटॅमिन (Vitamins) सी हे पोषक घटक आंब्याच्या पानात असतात. दहा ते पंधरा आंब्याचे पाने पाण्यात उकळून  ते पाणी रात्रभर तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गाळून त्या पाण्याचे सेवन करा त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

2. कडुलिंबाचे पाने

Neem Leaves

कडुलिंबाची पाने जरी पडू लागत असेल तरी याचे आरोग्याला अनेक फायदे (Benefits) होतात. या पानांमध्ये अँटी-व्हायरल आणि फ्लेवोनाईटस हे संयुगे आढळतात.त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास हे उपयुक्त ठरतात.कडूलिंबाचे पाने वाळवून मिक्सरमध्ये  बारीक पावडर करा रोज एक चमचा या पावडरचे सेवन करा.याने तुमचा मधुमेहाचा त्रास कमी होईल.

3. कढीपत्ता

Curry Leaves

कढीपत्ता हा सहज उपलब्ध होतो त्यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी हा खूप सोपा उपाय आहे त्यासाठी फक्त रोज सकाळी मूठभर कढीपत्ता चघळला पाहिजे.या पानांचा मधुमेहावर चांगला परिणाम होतो.

4. मेथीचे पाने

Fenugreek leaves

मेथीच्या भाजीचे आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात. मधुमेह रुग्ण आपल्या आहारात मेथीच्या पानाचा समावेश करून ब्लड शुगर लेवल नियंत्रित करू शकतात. मेथीची भाजी किंवा मेथीचा पराठा असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मेथीच्या पानाचे बनवून तुम्ही सेवन करू शकता. तसेच तुम्ही इतर ऋतूमध्ये कोथिंबीर चा वापर करू शकता.

5. पेरूची पाने

Guava leaves

पेरूच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्साइड व इतर जीवनसत्व आढळतात. पेरूची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असतात परंतु या पानाचे अतिसेवन करणे टाळले पाहिजे.पेरूची पाने तुम्ही पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता त्याचा मधुमेहावर चांगला परिणाम होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

SCROLL FOR NEXT