Kids Constipation Issue Saam Tv
लाईफस्टाईल

Constipation Problem in Kids: मुलांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? हे घरगुती उपाय ट्राय करुन पाहा

Constipation Home Remedies (in Marathi) : बदलेली जीवनशैलीमुळे आहारात आपल्याला सगळ्यात जास्त जंक फूडचे सेवन केले जाते. सततचे तेलकट आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Constipation Causes

  • बदलेली जीवनशैलीमुळे आहारात आपल्याला सगळ्यात जास्त जंक फूडचे सेवन केले जाते. सततचे तेलकट आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो.

  • शरीरात फायबरची कमतरता झाल्याने मुलांना (Child) बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आजकाल बहुतेक मुलांमध्ये ही समस्या उद्भवू लागली आहे. ज्यामुळे मुलांची चिडचिड होते.

पोट स्वच्छ नसल्यामुळे या मुलांना काहीही खाणे-पिणे शक्य होत नाही. यामुळे पोटदुखीचा त्रास होतो. जर तुमच्या मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्हाला काही घरगुती उपाय (Home Remedies) करु शकता.

1. आहार (Diet)

मुलांच्या आहारात (Food) भाज्या आणि फळांचे सेवन अधिक प्रमाणात द्या. तसेच शिजवलेले अन्नपदार्थ त्यांना खाऊ घाला. ६ महिन्यांपेक्षा जास्त मुलांना घन आहाराची आवश्यकता असते. याच्या कमतरतेमुळे फायबरची कमतरता होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.

2. मालिश करा

लहान मुलांच्या पोटाला तेलाने हलके मसाज करा. यामुळे त्यांना लवकर आराम मिळतो.

3. पपई खाऊ घाला

६ महिन्यांवरील मुलांसाठी पपई फायदेशीर आहे. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होते.

4. पुरेसे पाणी प्या

पुरेसे प्रमाणात पाणी न प्यायल्याने मुलांना बद्धकोष्ठतेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मुलांना सतत पाणी प्यायल्या द्या. याशिवाय तांदळाचे पाणी, फळांचा रस, नारळपाणी, सूप, ताक आणि दूधाचा आहारात समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT