Headaches after exercise saam tv
लाईफस्टाईल

व्यायाम केल्यानंतर सतत डोकेदुखी जाणवत असेल तर सावध व्हा, असू शकतो हा गंभीर आजार!

Surabhi Kocharekar

फीटनेस जपण्यासाठी आपण पुरेपुर प्रयत्न करतो. आपणं निरोगी राहवं यासाठी व्यायाम किंवा डाएट यांच्यावर अधिक भर दिला जातो. वजन संतुलित ठेवणं हा यामागील मुख्य हेतू असतो. जीममध्ये तासनतास वर्कआऊट केल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यामध्ये त्रास होणं किंवा घसा कोरडा पडणं या तक्रारी जाणवतात. मात्र यावेळी काही लोकांना डोकेदुखीचा त्रासही जाणवू शकतो.

अभ्यासकांच्या म्हणण्यांनुसार, जर वर्कआऊटनंतर तुमचं डोकं दुखत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. त्यामुळे तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, दररोज जीममध्ये व्यायाम केल्यानंतर जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर ही एक गंभीर समस्या असण्याची शक्यता आहे. सतत चालणं, जॉगिंग करणं किंवा वर्कआऊट करणं यामुळे डोकेदुखीची समस्या जाणवत असेल तर यामगे अनेक वेगळी कारणं असू शकतात.

व्यायामानंतर डोकेदुखीमागे काय असू शकतात कारणं?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, व्यायाम करताना आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यावेळी मेंदूमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डोकेदुखीची समस्या जाणवण्याचा धोका अधिक वाढतो. मुळात व्यायाम करताना आपण काही प्रमाणात श्वास रोखून धरतो. याच कारणाने मेंदूला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होऊ शकत नाही आणि डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.

रक्तप्रवाह वाढल्याने होतो त्रास

व्यायामाचा परिणाम आपल्या ब्लड प्रेशरवरही होतो. अनेकदा व्यायाम करताना तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. यावेळी शरीरात अचानक रक्तप्रवाह वाढल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. त्याचप्रमाणे व्यायाम करताना शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. ज्यावेळी आपलं शरीर डिहायड्रेट असतं त्यावेळी तेव्हा अशा प्रकारची डोकेदुखी होऊ लागते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर व्यायाम करताना तुम्हाला घाम आला तर तुम्ही लिक्विड डाएटचा पर्याय निवडला पाहिजे. शिवाय जर तुम्ही पुरेशा प्रमाणात झोप घेतली नसेल तरीही तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT