Women Health Saam Tv
लाईफस्टाईल

Women Health : महिलांनो, गर्धधारणेसाठी IVF चा विचार करताय? योग्य वय किती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

IVF Treatment : आयव्हीएफ उपचारांच्या चौकशीचा विचार केला जातो तेव्हा एक प्रश्न सातत्याने उद्भवतो तो म्हणजे या प्रक्रियेता यशाचा दर काय आहे? याचे उत्तर अनेक प्रमुख घटकांवर अवलंबून असते जसे की वय, वंध्यत्वाचे मूळ कारण आणि जीवनशैलीची निवड हे या प्रक्रियेच्या परिणामांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Women Health :

वंध्यत्वाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत आणि एआरटी उपचारांद्वारे जोडप्यांना आशेचा किरण मिळत आहे. आयव्हीएफ प्रक्रियेसंबंधी अनेक गैरसमज आहेत, ज्यामुळे रुग्णांमध्ये अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ शकतो. गर्भधारणेसाठी संघर्ष करणार्‍या जोडप्यांमध्ये आयव्हीएफसंबंधी गैरसमज तणाव निर्माण करतात.

जेव्हा आयव्हीएफ उपचारांच्या चौकशीचा विचार केला जातो तेव्हा एक प्रश्न सातत्याने उद्भवतो तो म्हणजे या प्रक्रियेता यशाचा दर काय आहे? याचे उत्तर अनेक प्रमुख घटकांवर अवलंबून असते जसे की वय, वंध्यत्वाचे मूळ कारण आणि जीवनशैलीची निवड हे या प्रक्रियेच्या परिणामांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील क्लिनिकल डायरेक्टर, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या डॉ सुलभा अरोरा म्हणतात की, 35 वर्षांखालील महिलांना त्यांच्या पहिल्या आयव्हीएफ सायकल दरम्यान गर्भधारणा (Pregnancy) होण्याची आशा असते. जसजसे वय या वाढत जाते तसतसे पुढील चक्रांमध्ये यशाचा दर कमी होऊ शकतो.

35-37 वयोगटातील व्यक्तींची स्वतःची स्त्रीबीज वापरणे हे अंदाजे 35-40% यश दराशी संबंधित आहे, तर 38 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये (Women) मात्र आयव्हीएफ प्रक्रियेचा यश दर तुलनेने कमी होतो. चाळीशीनंतर, पहिल्या आयव्हीएफ सायकल दरम्यान शक्यता लक्षणीयरीत्या 10% पेक्षा कमी आहे.

आयव्हीएफ प्रक्रियेत आई आणि बाळ दोघांनाही काही प्रमाणात धोका निर्माण होतो. आयव्हीएफ उपचाराचा परिणाम हा भ्रूण हस्तांतरित केला जातो यावर अवलंबून असतो. आयव्हीएफ हे वंध्यत्वाच्या समस्यांसाठी एक आशादायक उपचार पध्दती ठरते. परंतु हे सुरुवातीच्या चक्रात 100% यश दर सुनिश्चित करत नाही. म्हणूनच, या प्रक्रियेचा विचार करणार्‍या जोडप्यांनी प्रक्रियेसंबंधी सर्व पैलू समजून घेणे आवश्यक आहे.

भारतात (India) आयव्हीएफसाठी सरासरी यशाचा दर अंदाजे 35-40% इतका आहे. तंत्रज्ञान, कौशल्य पातळी आणि रुग्णांच्या संख्येतील असमानतेमुळे या दरांमध्ये विविध क्लिनिक आणि प्रदेशांमध्ये लक्षणीय चढ-उतार होऊ शकतात.

1. आयव्हीएफवर परिणाम करणारे घटक

आयव्हीएफचा यशाचा दर ठरवण्यासाठी वय हा महत्त्वाचा घटक आहे. 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रिया त्यांच्या स्त्रीबीजाच्या गुणवत्तेमुळे आणि प्रमाणामुळे जास्त यश मिळवतात. जसजसे महिलांचे वय वाढते तसतसे यशस्वी आयव्हीएफची शक्यता कमी होते. तुमच्या आयव्हीएफ तज्ज्ञांशी याविषयी चर्चा करा. एंडोमेट्रिओसिस किंवा पुरुष वंध्यत्वासारख्या काही परिस्थितींना विशेष उपचार पद्धतींची आवश्यकता असू शकते ज्यामुळे यशाच्या दरावर परिणाम होऊ शकतो.

IVF चे पूर्वीचे अयशस्वी प्रयत्न नंतरच्या चक्रांच्या यशाच्या दरावर परिणाम करू शकतात. प्रत्येक IVF चक्र हे अद्वितीय आहे आणि भूतकाळातील अपयश हे भविष्यातील परिणामांचा अंदाज बांधू शकत नाहीत. धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन, लठ्ठपणा आणि उच्च तणाव पातळी यासारखे जीवनशैली घटक आयव्हीएफ या यशाच्या दरांवर परिणाम करू शकतात. निरोगी जीवनशैलीची निवडी केल्याने तुमच्या यशस्वी परिणामाची शक्यता वाढू शकते.

वंध्यत्वावर उपाय म्हणून आयव्हीएफचा विचार करताना वास्तववादी अपेक्षा असणे महत्त्वाचे आहे. आयव्हीएफ प्रक्रियेच्या यश दराची गुंतागुंत समजून घेणे आणि संभाव्य परिणामांसाठी मानसिक तयारी ठेवणे आवश्यक आहे. आयव्हीएफ सह प्रत्येक जोडप्याचा प्रवास वेगवेगळा असतो. आयव्हीएफ प्रक्रियेचा यश दर समजून घेणे हे तुमच्या प्रजनन प्रवासात आणि सकारात्मक परिणाम साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांचा १ लाख ४१ हजार मतांनी विजयी

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT