Weight Loss Tips : सुटलेल्या पोटाला कमी करतील हे सूपरफूड्स, आजच ताटात समावेश करा

Weight Loss Diet Plan : कामाच्या वाढत्या व्यापाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम दिसून येतो. आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती हा मधुमेह, बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहे. लठ्ठपणा ही देखील त्यातली एक समस्या आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
Weight Loss Tips
Weight Loss Tips Saam Tv
Published On

Vitamin B Rich Foods :

हिवाळ्यात वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतात. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण आहारकडे नीटसे लक्ष देत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना बळी पडावे लागते.

कामाच्या वाढत्या व्यापाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम दिसून येतो. आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती हा मधुमेह, बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहे. लठ्ठपणा ही देखील त्यातली एक समस्या आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या गंभीर समस्यांपासून दूर राहाण्यासाठी वेळीच आपले वजन नियंत्रित करणे गरजेचे आहे. वाढत्या वजनामुळे लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहाण्यासाठी अनेकदा जिममध्ये जातात किंवा व्यायाम करतात. परंतु, शरीराला पुरेसे प्रमाणात व्हिटॅमिन्स (Vitamins) मिळाले तर तुम्ही सहज वजन कमी करु शकता.

Weight Loss Tips
Diabetes च्या रुग्णांनो या पद्धतीने पाणी पिताय? कधीच राहाणार नाही Blood Sugar नियंत्रणात

1. चिया सीड्स

वजन कमी (Weight loss) करायचे असेल तर आजपासूनच तुमच्या आहारात चिया सीड्सचा समावेश करा. जीवनसत्त्व बी -२, बी-१२, ओमेगा -३ फॅटी ऍसिड आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध, चिया सीड्स वजन कमी करण्यास मदत करतील.

2. काजू

प्रथिने, फायबर आणि महत्त्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध नट देखील वजन कमी करण्यासाठी अधिक उपयुक्त आहेत. हे खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील. ज्यामुळे तुमची भूक कमी होईल.

Weight Loss Tips
Skin Care Tips : टाचांना सतत भेगा का पडतात? असू शकते Vitamins ची कमतरता, कशी घ्याल काळजी?

3. एवोकॉडो

वजन कमी करण्यासाठी एवोकॅडोला तुमच्या आहाराचा एक भाग बनवू शकता. त्यात अधिक प्रमाणात पाणी (Water) आणि फायबर आढळतात. यामध्ये काही आवश्यक गुणधर्म आहेत. याच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत करेल.

4. अंडी

वजन कमी करण्यासाठी अंडी हा एक आरोग्यदायी आणि चवदार पर्याय आहे. प्रथिने, चरबी आणि जीवनसत्त्व बी आणि बी १२ चे उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com