Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : जुनाट सर्दी- खोकल्यावर फायदेशीर ठरेल, आजीच्या बटव्यातील 'हा' बहुगुणी पदार्थ

सर्दी-खोकल्यासाठी या पदार्थांचा वापर करा

कोमल दामुद्रे

Health Tips : सर्दी - खोकला हा सामान्य आजार आहे. हा आजार कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. या आजाराला सामोरे जाण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो.

काही वेळेस सर्दी व खोकला हा अधिक काळ टिकतो. सतत खोकलून आपल्याला बोलण्यास अजूनच त्रास होतो. परंतु, काही घरगुती पदार्थांचा वापर केल्यास आपली या आजारांतून सुटका होऊ शकते.

हा आजार टाळण्यासाठी तुळशीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. तुळशीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत आणि त्यात औषधी गुणधर्मदेखील आहे. हे रोग बरे करण्यासाठी आणि आपल्या श्वसन आरोग्यास चालना देण्यासाठी उत्तम आहे. तुळशीचा काढा हा एक प्रसिद्ध घरगुती उपाय आहे, ज्याचा वापर सर्दी आणि खोकल्यासाठी केला जातो आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील ओळखला जातो. त्याबद्दल जाणून घेऊया

तुळशीचा काढा आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Tulsi

तुळशी अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ते सर्दी आणि खोकल्यावरील उपचारांसाठी एक उत्तम पर्याय बनते. जीवनसत्त्व ए, ड, लोह आणि फायबरने समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

हा काढा कसा बनवायचा ?

Tulsi Tea

तुळशीचा काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने, उकडलेल्या तूरीच्या डाळीचे पाणी, तूप, काळी मिरी, जिरे आणि मध आवश्यक आहे. नंतर जिरे आणि मिरपूड फेटून घ्या. यानंतर कढईत तूप आणि मसाले न तापवता मध्यम आचेवर गरम करा. यात तूर डाळीचे पाणी घालून उकळा आणि थोडे घट्ट होण्याची वाट पहा. आता त्यात तुळशीची हिरवी पाने घाला आणि गॅस बंद करा.

यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे होणारा फायदा -

जिरे आणि काळी मिरी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, तर काळी मिरी जीवनसत्त्व (Vitamins) क ने समृद्ध आहे, जी एक उत्कृष्ट प्रतिजैविक म्हणून काम करते. मध खोकला बरा करण्यासाठी ओळखला जातो आणि श्वसनाच्या संसर्गापासून मुक्त होण्यास मदत करतो. तुपाचे अनेक फायदे (Benefits) देखील आहेत, जे श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करतात. थकवा आणि त्वचेच्या रोगांवर देखील उपचार करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Fasting: गुरुवारी उपवास केल्याने कोणते लाभ होतात?

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT