Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : दिवाळीत त्वचेला ग्लोइंग- मुलायम बनवायचे आहे? कॉफी पावडरचा असा करा वापर

Diwali Festival Skin Care : वाढते प्रदूषण, सतत स्क्रीन टाइमचा वापर आणि धुळीमुळे चेहऱ्याचे अतिप्रमाणात नुकसान होते.

कोमल दामुद्रे

Coffee Powder Benefits :

वाढते प्रदूषण, सतत स्क्रीन टाइमचा वापर आणि धुळीमुळे चेहऱ्याचे अतिप्रमाणात नुकसान होते. दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीय. पण, त्वचेची काळजी कशी घ्यावी? दिवाळीत पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन स्किन ट्रीटमेंट घेणे नेहमीच शक्य होत नाही.

परंतु स्वयंपाकघरात असणाऱ्या कॉफी पावडरचा योग्य प्रकारे वापर केल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल. कॉफीत असणारे गुणधर्म कोरड्या त्वचेपासून डार्क सर्कल घालवण्यास मदत करेल. याचा वापर कसा करायचा जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. फेस मास्क

चेहऱ्यावरील (Skin) डेड स्किन काढण्यासाठी फेसपॅक म्हणून कॉफीचा वापर करु शकतो. यासाठी कॉफीमध्ये दही, मध घालून चांगले मिक्स करा. १५ मिनिटे चेहऱ्याला लावल्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर साचलेली घाण आणि धूळ साफ करण्यास मदत करते. तसेच यामुळे तुमचा चेहरा अधिक सुंदर होण्यास मदत होईल.

2. त्वचेसाठी फायदेशीर

कॉफी ही नैसर्गिक एक्सफोलिएटिंग स्क्रब आहे. ज्याचा वापर त्वचेसाठी फायदेशीर (Benefits) ठरतो. यासाठी कॉफी नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइल घाला. चांगले मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल.

3. डार्क सर्कल

ताण आणि कामामुळे आपल्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येतात. यासाठी कॉफी उपयुक्त ठरेल. कॉफी थंड पाण्यात चांगली विरघळवून घ्या. नंतर डोळ्याखाली डार्क सर्कलवर हळूहळू लावा. दहा मिनिटांनंतर साध्या पाण्याने (Water) डोळे स्वच्छ धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT