CISF HC Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

CISF HC Recruitment 2023 : बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! हेड कॉन्स्टेबलसाठी 215 जागा रिक्त, अर्ज प्रक्रिया सुरु

CISF HC Bharti : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) हेड कॉन्स्टेबल (स्पोर्ट्स कोटा)मध्ये पदभरती सुरु झाली आहे.

कोमल दामुद्रे

CISF HC Recruitment 2023 Online Application Process:

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) हेड कॉन्स्टेबल (स्पोर्ट्स कोटा)मध्ये पदभरती सुरु झाली आहे. सरकारी खात्यात नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, तायक्वांदो यांसारख्या स्पोर्ट कोटातून २१५ जागा रिक्त आहेत. अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. अर्ज कसा कराल जाणून घेऊया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्पोर्ट (Sports) कोटाअंतर्गत हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी ऑनलाइन अर्जासाठी cisfrectt.cisf.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ नोव्हेंबर आहे.

1. रिक्त पदे - 215 जागा

2. पदाचे नाव - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)हेड कॉन्स्टेबल

3. शिक्षण (Education) पात्रता

उमेदवार हा १२ वी पासून असून तो स्पोर्ट कोट्यातून खेळणारा असावा. तसेच उमेदवाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधत्व केलेले असावे. त्याने कोणत्याही खेळात राष्ट्रीय स्तरातून पदक जिंकलेले असावे.

4. वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क किती?

  • या पदांसाठी उमेदवाराचे वय (Age) हे १८ ते २३ वर्षांपर्यंत असावे.

  • तसेच OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

5. निवड प्रक्रिया कशी असेल?

ही निवड प्रक्रिया PST/PET द्वारे केली जाईल. यामध्ये लेखी परीक्षेसोबत वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल.

6. अर्ज कसा कराल?

  • अर्ज प्रक्रिया करण्यासाठी cisfrectt.cisf.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

  • नोंदणी केल्यानंतर उमेदवार लॉग इन करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

  • आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT