Rules Change In November 2023 : सणासुदीत खिशाला बसणार कात्री, 1 नोव्हेंबरपासून बदलणार हे नियम

Rules Changes From 1st November : १ नोव्हेंबरपासून देशात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Rules Change In November 2023
Rules Change In November 2023Saam Tv
Published On

Financial Rules :

लवकरच नोव्हेंबर महिना सुरु होणार आहे. अशातच १ नोव्हेंबरपासून देशात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होईल.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसारखा मोठा सण येत असल्यामुळे या महिन्यात महागाईची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागणार आहे. एलपीजीच्या किमती, पेट्रोल-डिझेल आणि अनेक उत्पादनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या या नियमांबद्दल जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. एलपीजीच्या किमतीत वाढ

एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder), सीएनजी आणि पीएनजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला ठरविले जातात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात. आखाती देशातील युद्धामुळे आणि सणासुदीचा काळ असल्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या किमती (Price) वाढू शकता.

2. ई- चलान

NIC नुसार, 100 कोटी किंवा त्याहून अधिक असलेल्या व्यवसायांना १ नोव्हेंबरपासून महिन्याभराच्या आत ई-चलान पोर्टलवर GST चलान अपलोड करावा लागेल. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता.

Rules Change In November 2023
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : या राशींवर येणार मोठं संकट! कौटुंबिक वादात अडकाल, पगारात वाढ होण्याची शक्यता

3. आयात संबंधित अंतिम मुदत

सरकारने HSN 8741 श्रेणीतील अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जसे की, लॅपटॉप, टॅब्लेट आणि कम्प्युटच्या उत्पादनांच्या आयातीवर ३० ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. आता यामध्ये १ नोव्हेंबरपासून बदल होण्याची शक्यता आहे.

4. LIC Policy

जर तुमची LIC Policy बंद झाली असेल आणि पुन्हा सुरु करायची असल्यास तुम्ही ३१ ऑक्टोंबरपर्यंत पुन्हा सुरु करु शकता.

5. ३१ ऑक्टोबरपूर्वी ही कामे करा

RBI डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा प्रीपेड कार्डसाठी नेटवर्क निवडण्याची सुविधा बँक देत आहे. यासाठी नेटवर्कची सुविधा ३१ ऑक्टोबरपूर्वी करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com