Chutnefy Sucess Story Saam Tv
लाईफस्टाईल

Chutnefy Sucess Story : चटणी विकून उभी केली ६ कोटींची कंपनी; Chutnefy च्या मालकाचा प्रेरणादायी प्रवास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chutnefy Founder Story :

माणसांच्या मनात जायचा मार्ग हा पोटातून असतो असे म्हणतात. अनेकदा असेच काही प्रयोग आपल्या घरात होत असतात. घरातील स्त्री काही न काही नवीन पदार्थ तयार करत असते. जेवणातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चटणी. जेवण कितीही चविष्ट जेवण असेल तरी ते चटणीशिवाय अपूर्णच. याच चटणीचा व्यवसाय करुन दोन मित्रांनी कोट्यवधींची कंपनी बनवली आहे.

जेवणात सर्वात महत्त्वाचा असलेला पदार्थ म्हणजे चटणी. चटणी तयार करायला सोपी आणि चविष्ट असते. परंतु सध्याच्या व्यस्त जीवनात चटणी बनवण्यासाठीही अनेकांना वेळ नसतो. याच गोष्टीचा विचार करुन Chutnefy ची सुरुवात झाली.

दोन मित्रांची आयडिया

प्रसन्ना आणि श्रेयस हे दोघे लहानपणापासूनचे मित्र. त्यांच्याच डोक्यात सर्वात आधी 'चटणीफायची' कल्पना आली. दैनंदिन जीवनात मुले शाळेत जाताना त्यांचा नाश्ता, डबा, नवऱ्याचा डबा आणि घरातील व्यक्तींचा नाश्ता एकाचवेळी करताना महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागयचा. फारसा वेळ मिळत नसे. तेव्हा त्यांनी बायकोला सकाळी चटणी बनवण्यासाठी मदत करायचे ठरवले. तेथूनच त्यांना नवीन बिझनेसची आयडिया मिळाली.

या दोघांनी मिळून खूप प्रयोग केले. वेगवेगळे फ्लेवर आणि वेगवेगळ्या प्रकारे चटण्या बनवण्यास सुरुवात केली. त्यात काही चटण्या फसल्या तर काही चटण्या चांगल्या बनल्या. त्यानंतर सुधारणा करत त्यांनी 2022 मध्ये Chutnefy ची सुरुवात केली.

कोट्यवधींची कंपनी

चटणीफाय ही कंपनी वेगवेगळ्या फ्लेवरच्या चटण्या बनवते. ताज्या आणि अस्सल चवीच्या चटण्या बनवण्यास कंपनीने सुरुवात केली. पॅकेजमध्ये पाणी टाकून फक्त 5 सेकंदात तुम्ही चटणी तयार करु शकता. अशी या कंपनीची संकल्पना आहे. या चटण्यांना अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यांसारख्या मोठ्या देशांमध्ये खूप मागणी आहे. त्यातून त्यांनी खूप जास्त कमाई केली आहे.

कंपनीतून प्रसन्ना आणि श्रेयस दर महिना 50 लाख रुपये तर वर्षाला 6 कोटींची कमाई करत आहे. फक्त एका वर्षात कंपनीने खूप चांगली कमाई केली आहे. कंपनी बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण तयार करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT