Chronic Kidney Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Chronic Kidney Disease : सावधान! शरीरात ही लक्षणे दिसल्यास होऊ शकतो किडनीवर परिणाम, कशी घ्याल काळजी

Kidney Health : किडनीचे आरोग्य सुरक्षित असेल तर आपले संपूर्ण आरोग्य निरोगी असेल.

कोमल दामुद्रे

Kidney Disease :

किडनी ही आपल्या शरीराचा अतिशय छोटापण सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे. आरोग्यामध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावते. किडनीचे आरोग्य सुरक्षित असेल तर आपले संपूर्ण आरोग्य निरोगी असेल.

रक्त शुद्ध करण्यापासून ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम किडनी करते. प्रत्येक ३० मिनिटांनी मूत्रपिंड शरीरातील रक्त फिल्टर करण्यासाठी आणि टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ आणि द्रव काढून टाकण्याचे काम करते. सध्या भारतात अनेक लोक किडनीच्या आजारांने ग्रस्त आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. किडनीच्या आजाराचे मुख्य कारण

जेव्हा तुमचे दोन्ही मूत्रपिंड पूर्णपणे खराब होतात आणि रक्त शुद्ध होत नाही. त्यावेळी तुम्हाला दीर्घकालीन किडनीच्या आजाराचा (Disease) सामना करावा लागतो. किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरात द्रव आणि टाकाऊ पदार्थांचे प्रमाणात वाढते, ज्यामुळे हृदयविकार आणि पक्षघात सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच किडनीच्या आजारामुळे मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब, हृदयविकार (Heart Attack) आणि लठ्ठपणा या आजारांना तोंड द्यावे लागते.

किडनीच्या आजाराला सायलेंट आजार म्हणून ओळखले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाही. ही समस्या हळूहळू शरीराच्या आत वाढत जाते तसेच याचे निदान लवकर होत नाही. हा आजार ओळखण्यासाठी रुग्णाला नियमित रक्त आणि लघवीची चाचणी करावी लागते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असणाऱ्यांना याचा अधिक सामना करावा लागतो.

2. किडनीच्या आजाराची लक्षणे

  • वजन वाढणे

  • भूक न लागणे

  • घोट्याला सूज

  • श्वास घेण्यास अडचण

  • थकवा येणे

  • लघवीतून रक्त येणे

  • सतत डोकेदुखी

3. हा आजार कसा टाळाल?

किडनीचा आजार टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी रक्ताची चाचणी करुन घ्या. याचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा. खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील पाहा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! मुंबईतील समुद्रात चार महिन्यात २४ वेळा भरती; उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा, हवामान विभागाचा अलर्ट

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

SCROLL FOR NEXT