Loneliness : एकटेपणामुळे मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम, WHO ने दिली धोक्याची घंटा; कशी कराल यावर मात?

Loneliness Affect Health : एकटेपणामुळे हृदयविकार, पक्षाघात, स्मृतिभ्रंश, नैराश्य, चिंता आणि अचानक मृत्यूचा धोका असतो.
Loneliness
LonelinessSaam Tv
Published On

Causes Of Loneliness :

वाढत्या कामाच्या व्यापामुळे अनेक वयोगटातील लोकांना सततच्या टेन्शनला बळी पडताना पाहायलं आहे. त्यामुळे चिंता करणे, अस्वस्थ वाटणे, एकटे वाटणे यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

स्पर्धेच्या युगात ध्येय गाठण्यासाठी केलेली धडपड यामध्ये आपण नात्यांसोबत आरोग्याकडेही दुर्लक्ष करतो. त्यामुळे जवळची व्यक्ती दूरावण्याची भावना मनात येतेच पण आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. हा एकाकीपणा जीवघेणा होऊन मानिसक तणाव (Mental Health) देखील निर्माण होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागतिक आरोग्य संघटनेने एकटेपणा हा आरोग्यासाठी अधिक घातक आहे असे मत मांडले. यामुळे हृदयविकार (Heart Attack), पक्षाघात, स्मृतिभ्रंश, नैराश्य, चिंता आणि अचानक मृत्यूचा धोका असतो. डब्ल्यूएचओच्या मते, सुमारे ५ ते १० टक्के किशोरवयीन मुले एककीपणाशी झुंज देत आहेत. त्यामुळे ही संख्या वाढू शकते. एकाकीपणाच्या माणसाच्या दैनंदिन जीवनावर खोलवर परिणाम होतो.

Loneliness
Parenting Tips : पालकांनो, वाढत्या स्क्रिन टाइमचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम; कशी घ्याल काळजी?

यामुळे त्याच्या कामावर, खाण्यापिण्याच्या सवींयवर आणि वागण्यावर परिणाम होतो. या समस्येला कसे सामोरे जावे हे जाणून घेऊया.

1. स्वत:शी संवाद साधा

बरेचदा आपण स्वत:ला कमी लेखतो. आजूबाजूला माणसांची गर्दी असून देखील आपल्याला सतत एकटेपणाची भावना मनात येते. त्यामुळे अशावेळी स्वत:शी संवाद साधा. आपली कमतरता कोणती ते पाहा.

Loneliness
Garlic Chutney Recipe : झणझणीत अन् टेस्टी राजस्थानी लसणाची चटणी, पाहा रेसिपी

2. मित्रांशी चर्चा करा

तुमच्या जवळच्या मित्रांशी (Friend) बोला. मित्रांना आपण फारसे भेटत नाही त्यामुळे नात्यात दूरावा येतो. त्यांच्याशी आपले नाते पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करा.

3. नवीन छंद जोपासा

एकाकीपणावर मात करण्यासाठी तुम्ही एखादा नवा छंद जोपासू शकता. यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमचे मन त्यात गुंतून राहिल. नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com