कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Congress Reshuffle in Karnataka : काँग्रेसने ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (KPCC) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नवीन नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली.
Congress Reshuffle in Karnataka
Congress has appointed B.K. Hariprasad as the new Karnataka Pradesh Congress Committee presidentSaam tv
Published On
Summary
  • कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा संघटनात्मक फेरबदल

  • बी. के. हरिप्रसाद हे अनुभवी काँग्रेस नेते

  • डी. के. शिवकुमार यांच्या जागी हरिप्रसाद यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

कर्नाटक राज्यात मोठी राजकीय उलाढाल झाली आहे. डी. के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसने पक्षात मोठा बदला केला आहे. काँग्रेस पक्षाने नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला आहे. ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या डी.के. शिवकुमार यांच्या जागी हरिप्रसाद यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

कर्नाटकमधील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार शिवकुमार यांना तीन वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर केपीसीसी अध्यक्षपदासाठी नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत बी.के. हरिप्रसाद?

बी.के. हरिप्रसाद हे सध्या कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. काँग्रेसमधील अनुभवी आणि संघटनात्मक राजकारणात मजबूत पकड असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतात.हरिप्रसाद यांनी यापूर्वी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवरदेखील काम केले आहे.

हरिप्रसाद हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील बिल्लव समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कर्नाटकातील या समाजाचा राजकीय प्रभाव लक्षणीय मानला जातो. यापूर्वी जनार्दन पुजारी आणि एस. बंगारप्पा यांसारख्या बिल्लव समाजातील नेत्यांनीही केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत हरिप्रसाद हे विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार होते.

मात्र एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. तसेच १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी त्यांचा पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com