Headaches freepik
लाईफस्टाईल

Headache: डोकेदुखीचा त्रास छळतो? ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Headache With These Symptoms: डोकेदुखी हा फक्त शारीरिक त्रास नाही, तर गंभीर आजारांचं लक्षण असू शकते. ब्रेन ट्युमर, मायग्रेन, सायनस किंवा ताणामुळे होणारी डोकेदुखी वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

Bhagyashree Kamble

डोकेदुखी हा सामान्य वाटणारा त्रास असला तरी, काही वेळेस ही वेदना गंभीर आरोग्य समस्यांची सूचक ठरू शकते. डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला की आपण झोप, मसाज किंवा औषध घेतो. पण जर तरीही डोकेदुखीचा त्रास कमी होत नसेल तर, ही चिंतेची बाब असू शकते. कधीकधी ही डोकेदुखी गंभीर आजारांना सूचित करते. जर आपल्याला डोकेदुखीसह काही गोष्टींचा अधिक त्रास जाणवत असेल, तर आपल्याला गंभीर आजारांचा धोका असू शकतो. त्यामुळे तातडने तज्ज्ञांचा सल्ला किंवा डॉक्टरांना पाचारण करणे गरजेचं आहे.

डोकेदुखीमागे ६ कारणे:

ब्रेन ट्यूमर

जर सकाळी डोकेदुखीचा त्रास होत असेल यासह उलट्या आणि मळमळ याचाही त्रास होत असेल तर, ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे आहेत. ब्रेन ट्यूमरमध्ये दृष्टी देखील अंधुक होते. जर आपल्याला डोकेदुखीसह या समस्याही छळत असतील, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मायग्रेन

जर डोकेदुखीसोबत प्रखर प्रकाश, मोठा आवाज किंवा तीव्र वासाचा त्रास होत असेल, तर आपल्याला कदाचित मायग्रेनचा त्रास असू शकतो. एक किंवा दोन तासांना आपल्याला याचा त्रास जाणवू होऊ शकतो.

उच्च रक्तदाब

वारंवार डोकेदुखी, विशेषत: सकाळी उठल्यावर डोकं दुखत असेल, तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. जर आपली दृष्टी अंधुक होत असेल किंवा मानेमध्ये जडपणा जाणवत असेल तर, तातडीने रक्तदाब तपासा.

सायनस इन्फेक्शन

नाक बंद होणे, कपाळावर किंवा गालावर दाब जाणवणे आणि डोकेदुखी वाढणे ही सर्व सायनसची लक्षणे आहेत. अॅलर्जी आणि हवमानातील बदलामुळे ही समस्या अधिक वाढते.

डोळ्यांची कमजोरी

बराच वेळ स्क्रीन पाहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर डोकेदुखी, चिडचिड किंवा दृष्टी अंधुक होणे या गोष्टी दृष्टी कमकुवत असल्याचे दर्शवते.

ताण आणि चिंता

ताण, चिंता किंवा नैराश्याचा थेट परिणाम डोकेदुखीच्या स्वरूपात दिसून येतो. याचा त्रास आपल्याला दररोज होऊ शकतो. विशेषत: सायंकाळच्या सुमारास संपूर्ण डोकं जड होतं. जर आपल्यालाही याचा त्रास होत असेल तर, कदाचित स्ट्रेसमुळे डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार

Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT