हिवाळा सुरु झाला की, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. वातावरणातील बदलामुळे मुलांना अनेक संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागते. बदलत्या हवामानाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
मुलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या आहारात अनेक आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत झाल्यानंतर ते लवकर आजारी पडत नाही. त्यांसाठी त्यांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
1. पालक
पालकमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. पालकमध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क, ई, अँटीऑक्सिडंट्स, लोह, कॅरोटीनोइड्स यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
2. ब्रोकोली
लहान मुलांसाठी (Kids) ब्रोकोली खूप चांगली आहे. ब्रोकोलीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जे मुलांच्या विकासात मदत करतात. ब्रोकोली खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्व क, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
3. रताळे
रताळे लहान मुलांच्या पोषणासाठी अधिक चांगले आहे. रताळ्यामध्ये बीटा कॅरेटीन अधिक आढळते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रताळे खाल्ल्याने जीवनसत्त्व ए ची कमतरता भरुन काढता येते. यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
4. आले-लसूण
आहारात आले-लसणचा (Garlic) समावेश करा. हे शरीराला आवश्यक प्रमाणात अँटीअँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट पुरवते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आले लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास होणार नाही.
5. हळद
मुलांना तुम्ही हळदीचे दूध प्यायला देऊ शकतात. यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हळदीमध्ये असे अनेग गुणधर्म आहेत ज्यामुळे संसर्गजन्य आजारापासून दूर होण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.