हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? Good Cholesterol बद्दल जाणून घ्या काही टीप्स

Good Cholesterol Tips : कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्यासाठी अधिक घातक समजले जाते. यामुळे आपल्याला हार्ट अटॅक, स्ट्रोक व इतर गंभीर आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हृदयाच्या वाढत्या समस्यांच्या आजारावर दोन कारणे मोठ्या प्रमाणात आहेत.
Good Cholesterol Tips
Good Cholesterol TipsSaam Tv
Published On

Good Cholesterol Foods :

खराब जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. रक्तातील कोलेस्ट्रॉल अचानक वाढल्यास आपल्याला त्रास होतो. ज्यामुळे गंभीर आजारांना बळी पडतो.

कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्यासाठी (Health) अधिक घातक समजले जाते. यामुळे आपल्याला हार्ट अटॅक, स्ट्रोक व इतर गंभीर आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हृदयाच्या वाढत्या समस्यांच्या आजारावर (Disease) दोन कारणे मोठ्या प्रमाणात आहेत.

चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. ज्यामुळे हृदयातील धमन्या ब्लॉक होऊन हृदयविकाराचा झटका (Heart Attack), उच्च रक्तदाब, पक्षाघात यांसारख्या अनेक जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात.

Good Cholesterol Tips
Pimple Home Remedies: पिंपल्समुळे त्रस्त आहात? चेहऱ्यावर सतत डाग दिसतात? या टीप्स फॉलो करा

यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल देखील कमी करते. ज्यामुळे धमन्या ब्लॉक होऊ लागतात. चांगले कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकते आणि ते यकृतात पोहोचवते. यासाठी चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी काही सवयी बदलून एचडीएलचे प्रमाण सहज वाढवता येते. जाणून घेऊया शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी कशी वाढवायची ते.

1. व्यायाम करा

व्यायाम केल्याने तुमची शारीरिक ताकद वाढण्यासोबतच चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते. यासाठी एरोबिक व्यायाम नियमितपणे करा. आठवड्यातून तीन ते चार दिवस व्यायाम करा. ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होईल.

Good Cholesterol Tips
Mind Detox: शरीरासोबत मेंदूलाही करायचे आहे डिटॉक्स? हे रुटीन फॉलो करा

2. ओमेगा-३ फॅटी ऍसिड

हृदय निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी फॅट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आहारात ओमेगा-३ फॅटी ऍसिड असणारे पदार्थ खा. जसे की, फॅटी फिश, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, बदाम यांचा समावेश करा. हे पदार्थ चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

3. अँथोसायनिन्स असणारे पदार्थ

आहारात वांगी, ब्लू बेरी, लाल कोबी इत्यादी पदार्थाचा आहारात समावेश करा. या रंगीत पदार्थांमध्ये अँथोसायनिन्स नावाचे संयुग आढळते. जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील प्लाक कमी जमा होते.

4. वाढलेले वजन

वाढलेल्या वजनामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारात कमी कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश करा. आहारात फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. हे वजन कमी करण्यासोबतच हृदयासाठी देखील फायदेशीर आहे.

Good Cholesterol Tips
Thyroid Disease: थायरॉईड आणि लठ्ठपणा - एक न उलगडणारे कोड

5. धुम्रपान करु नका.

धुम्रपानाचा धमन्यांवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com