Mind Detox: शरीरासोबत मेंदूलाही करायचे आहे डिटॉक्स? हे रुटीन फॉलो करा

Brain Detox : आरोग्याला निरोगी ठेवणे जितके गरजेचे आहे तितकेच मनाला आणि मेंदूला निरोगी ठेवण गरजेचे आहे. यासाठी शारीरिक हालचाली करणे देखील महत्त्वाचे आहे.
Mind Detox
Mind Detox Saam Tv
Published On

Detox Problem :

आरोग्याला निरोगी ठेवणे जितके गरजेचे आहे तितकेच मनाला आणि मेंदूला निरोगी ठेवण गरजेचे आहे. यासाठी शारीरिक हालचाली करणे देखील महत्त्वाचे आहे.

बॉडी डिटॉक्सिफिकेशन ही एक अशी प्रक्रिया आहे जे आपल्या शरीर आतून स्वच्छ करते. डिटॉक्स म्हणजे शरीर, मन आणि आत्मा स्वच्छ करणे. शारीरिकरित्या डिटॉक्स आहार किंवा डिटॉक्स ज्यूस घेतल्याने आरोग्य सुधारत नाही. यासाठी डिटॉक्स असा असायला पाहिजे की, ज्यामुळे तुमचे हृदय आणि मन दोन्ही स्वच्छ होतील. त्यासाठी कोणते रुटीन फॉलो करायला हवे. जाणून घेऊया.

बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपल्यापैकी बहुतेकजण तणावाखाली राहतात. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमचे मन तसेच शरीर डिटॉक्स करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही येथे दिलेल्या टीप्स (Tips) वापरून पाहू शकता.

Mind Detox
VI चा जबरदस्त प्लान! अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह ६ महिने Swiggy-OTT चे Subscription मिळणार फ्री

1. हे रुटीन फॉलो करा.

  • दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करा. ज्यामुळे तुमचे यकृत आणि मूत्रपिंड दोन्ही स्वच्छ होतील. यादरम्यान चहा किंवा कॉफीचे सेवन करु नका.

  • आपल्या दिवसाची सुरुवात फळे आणि ड्रायफ्रूट्सच्या मदतीने स्मूदी ट्राय करु शकता. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जात्मक वाटेल.

  • जर तुम्हाला सकाळी चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही पेपरमींट किंवा ग्रीन टी पिऊ शकता.

Mind Detox
Pimple Home Remedies: पिंपल्समुळे त्रस्त आहात? चेहऱ्यावर सतत डाग दिसतात? या टीप्स फॉलो करा

2. माइंड डिटॉक्स करण्यासाठी काय कराल?

  • सकाळी उठल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर तुम्हाला दिवसभरात काय करायचे आहे याचे नियोजन करा.

  • नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठी ध्यान करा

  • जॉगिंग, पोहायला जा किंवा वॉकिंग करा. यामुळे तुमचे माइंड डिटॉक्स होईल. दिवसही चांगला जाईल.

  • सोशल मीडियापासून (Social Media) स्वत:ला लांब कसे ठेवता येईल याचा विचार करा. निसर्गाच्या संपर्कात या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com