Weight Loss Tips
Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : चिकन की, मासे ? लवकर वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये काय फायदेशीर

कोमल दामुद्रे

Diet For Weight Loss: आजकाल वजन वाढणे ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक लोक त्यांच्या वाढत्या शरीरामुळे त्रासलेले आहेत. बदललेले खानपान आणि जीवनशैलीमुळे आपले शरीर सुटत चालले आहे.

त्याचबरोबर लठ्ठपणाचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त प्रमाणात कॅलरीचे सेवन करणे. जे लोक हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात. त्यांना लठ्ठपणामुळे होणाऱ्या त्रासांना सामोरे जावे लागते.

अशातच लठ्ठपणाला कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केलं पाहिजे. खरंतर प्रोटीन जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तुम्हाला भूक कमी लागते. त्याचबरोबर प्रोटीन युक्त फूड (Food) हे आपले मसल्स बिल्डिंगचे काम सुद्धा करते.

ज्यामुळे तुमची वेट लॉस जर्नी सोपी होते. त्याचबरोबर नॉनव्हेज फूडमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. अशातच तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यापुढे चिकन आणि मासे हे दोन विकल्प आहेत. परंतु लवकर वजन कमी होण्यासाठी काय खायला हवं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. मासे खाण्याचे फायदे :

मासे खाल्ल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे (Benefits) होऊ शकतात. माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. म्हणूनच मासे खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. मच्छी एक पातळ मांस असते. जे खाल्ल्याने लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर मासे खाल्ल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. मासे खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात उपलब्ध असते. जे हार्ट हेल्थसाठी गुणकारी असते.

2. वजन कमी करण्यासाठी मासे खायला हवे की नाही?

जर्नल न्यूट्रिशन, मेटाबॉलिझम आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डीजिजमध्ये प्रकाशित असणाऱ्या एका अध्ययनानुसार, वेट लॉसमध्ये माशांचं सेवन करणे हे इतर नॉनव्हेज फूड खाण्यापेक्षा चांगले मानले जाते.

Weight Loss Tips

3. वजन कमी करताना चिकन खाल्ल्याने काय होते?

चिकन मध्ये भरपूर स्वास्थ पोषक तत्वे उपलब्ध असतात. जे वजन झपाट्याने कमी करण्यासाठी मदत करतात. नियमित चिकन खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर तुमच्या मसल्समध्ये ग्रोथ होते. सोबतच भूक देखील कमी होत जाते.

4. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी चिकन खाणे गरजेचे आहे की, मासे खाणे गरजेचे आहे ?

विशेष तज्ज्ञांनी सांगितले आहे की, वजन कमी करण्यासाठी चिकन बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी तुम्ही उकडवलेल चिकन किंवा कमी मीठ वालं चिकन सूप पिऊ शकता. अशातच चिकनच्या जागेवर माशांचे सेवन करणे देखील चांगले असते. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असल्यामुळे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Today's Marathi News Live : हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

SCROLL FOR NEXT