Weight loss Tips : अनेक लोक वाढत्या वजनामुळे ग्रस्त आहेत. अनेकांचे वजन वाढल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच तुम्ही तुमचं वजन कमी करण्याची काही टॉनिक घेत असाल तर आम्ही तुम्हाला आज अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवता येणार आहे.
स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले आपल्या शरीरासाठी चांगले असतात. आपल्या घरातील मसाल्यांमुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे (Benefits) होतात. जास्त करून आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा या मसाल्यांचा वापर करून आपण बरे होऊ शकतो.
1. वाढते वजन
मसाल्यांमध्ये (Spices) मेथी आणि ओवा या दोघांचे नाव सर्वात वरती असते. मेथी आणि ओव्याचे सेवन दररोज केल्याने तुम्ही मधुमेह आणि वजन कमी करू शकता. त्याचबरोबर मेथीच्या सततच्या सेवनामुळे अपचन आणि अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आराम मिळतो. मेथीच्या सेवनाने तुम्ही तुमचं वजन झपाट्याने कमी करू शकता.
2. ब्लड शुगर कंट्रोल
स्त्रियांमध्ये (women) वय वाढत चाललं कीमेटाबॉलीजम सिस्टम कमजोर पडू लागत. म्हणूनच वजन वाढणे अशा समस्या अधिक प्रमाणात वाढतात. ओव्यामध्ये अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. मेथीच्या नियमित सेवनामुळे रक्तामधील साखरेचं (Sugar) प्रमाण नियंत्रित राहते.
3. गॅसेसची समस्या
ज्या व्यक्तींना स्थूलपणा तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी रोज ओवा चावून खालल्यास त्यांचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मेथीच्या आणि ओव्याच्या नियमित सेवनाने अपचन आणि पोटामध्ये गॅस संबंधीचे प्रॉब्लेम्स नाहीसे होतात.
4. सर्दी-खोकल्यावर रामबाण
तुम्हाला सर्दी खोकला झाल्यास ओवा आणि मेथी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे मधुमेह (Diabetes) रोग्यांनी आणि इतर लोकांनी देखील मेथी आणि ओवा नियमती खाल्ल पाहिजे. जेणेकरून तुमचे स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.