Weight Loss Tips : वाढलेल्या वजनामुळे आपण सगळेच त्रस्त असतो. हिवाळ्यात आपल्या प्रत्येकाला व्यायाम किंवा योगा करायला मिळत नाही. त्यासाठीच आपण नवनवीन योजना आखत असतो.
वजन कमी करण्यासाठी आपण घरगुती पदार्थांचा अवलंब न करता आपण जीम किंवा कसरत करतो. परंतु, त्यासोबतच आपल्याला आहाराची देखील काळजी घ्यावी लागते. काळी मिरी फक्त भारतातच (India) नाही तर जगभरात स्वयंपाकासाठी वापरली जाते. हे सर्वात लोकप्रिय मसाल्यांपैकी एक आहे. याचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर त्याचा आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात काळ्या मिरीचा फायदा वरदानापेक्षा कमी नाही.
यामुळे तुम्ही खोकला, सर्दी, घसा खवखवणे यासारख्या समस्यांवर मात करू शकता, कारण त्यात मुबलक प्रमाणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे केवळ वेदना कमी करत नाहीत तर संसर्गापासून संरक्षण देखील करतात. आज आपण हिवाळ्यात काळी मिरी खाण्याचे आरोग्य (Health) फायद्यांविषयी सांगणार आहोत. जाणून घेऊया या काय आहेत...
थंडीत काळ्या मिरीचे फायदे
1. रोगप्रतिकारशक्ती वाढेल
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीवर खूप विपरीत परिणाम होतो आणि रोगांशी लढण्याची आपली क्षमता कमी होऊ लागते. अशावेळी काळी मिरी वापरावी, कारण त्यात असलेले अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास प्रभावी आहेत.
2. बद्धकोष्ठता आराम
हिवाळ्यात होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या समस्येवर काळी मिरी वापरून मात करता येते. यासाठी आहारात काळी मिरी समाविष्ट करा.
3. सांधेदुखीपासून आराम मिळेल
हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या खूप वाढते. आजकाल तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. कोरोनानंतर परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अशा स्थितीत काळी मिरी तुम्हाला या दुखण्यात खूप आराम देईल. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म सांधीवात रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासोबतच सांधे आणि मणक्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.
4. वजन कमी करण्यास उपयुक्त आहे
काळी मिरी वजन कमी (Weight Loss) करण्यात जादूसारखे काम करते. ग्रीन टीमध्ये मिसळून प्यायल्यास चांगले परिणाम मिळतील. वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा (Benefits) होईल आणि जलद वजन कमी होऊ शकते. काळी मिरीमध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट्स अतिरिक्त चरबी वितळण्यास खूप मदत करतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.