छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी मुघल शासकांविरुद्ध युद्धे लढली. त्यांच्या शौर्याची कहाणी इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. छ६पती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये पुण्यातील भव्य शिवनेरी किल्ल्यावर झाला.
प्रत्येक भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अभिमानाने घेतो. त्यांच्या शौर्याचे उदाहरण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात दिले जातात. शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक, शूर योद्धा आणि देशभक्त होते. मुघलांना पराभूत करण्यासाठी त्यांनी मराठा स्वराज्याचा पाया घातला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी आणि मौल्यवान विचार जाणून घेऊयात. जे आयुष्यात मोठे बदल नक्की घडवून आणतील.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ मराठा समाजातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या आदराने आणि श्रद्धेने घेतले जाते. त्यांचे संपूर्ण जीवन केवळ युद्धे आणि विजयांची कहाणी नाही तर प्रत्येक मानवासाठी एक प्रेरणा आहे. जी आपल्याला शिकवते की खरे नेते तेच असतात जे कोणत्याही भेदभावाशिवाय आपल्या लोकांसाठी काम करतात. त्यांचे शौर्य, धैर्य आणि देशभक्ती आजही सर्वांसाठी प्रेरणा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार
"लहान ध्येयाकडे तुमचे एक छोटे पाऊल तुम्हाला मोठे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात."
"जेव्हा मनात निश्चय दृढ असेल तेव्हा मोठा डोंगरही मातीच्या लहान ढिगाऱ्यासारखा वाटतो."
"शत्रूला कमजोर समजण्याची चुकी करु नका, किंवा त्याला अधिक बलवान समजून भीती मनात बाळगू नका."
"जेव्हा ध्येय जिंकण्याचे असते, तेव्हा ते साध्य करण्यासाठी कितीही कठोर परिश्रम किंवा किंमत मोजावी लागते."
"कोणतीही कार्य करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करणे गरजेचे आहे; कारण भावी पिढ्याही त्याच गोष्टींचा अनुसरन करतात."
"शत्रू कितीही बलवान किंवा क्रूर असला तरी, फक्त आपल्या दृढनिश्चयाने आणि उत्साहाने त्याला पराभूत करू शकतो."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.