
अनेकवेळा डाएट आणि वर्कआउट करूनही वजन का कमी होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे मंद पचनक्रिया. म्हणजेच वजन कमी करण्याच्या मार्गात मंद पचनक्रिया एक मोठा अडथळा बनतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, वजन कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी काही आोरग्यदायी पेय(Drinks for Fat Loss ) प्यायल्याने शरीरात जमा झालेले अनहेल्दी फॅट्स कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे वजन कमी करणे आणखी सोपे होते. हे पेय कोणते जाणून घ्या.
लिंबू पाणी
सकाळी लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी हे एक आरोग्यदायी पेय आहे .कारण यात कॅलरीज कमी असतात. याशिवाय, ते पचन सुधारण्यास आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करतात. लिंबू हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुमची त्वचा देखील सुधारते.
चिया बियांचे पाणी
सुपरफूड्स म्हणून ओळखले जाणारे चिया बिया वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये असलेले फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड तुम्हाला केवळ ऊर्जावान बनवत नाहीत तर तुमची पचनसंस्था देखील मजबूत करतात. या बियांना पाण्यात भिजवून सेवन केले पाहिजे. ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते.
हर्बल टी
आलं, पुदिना किंवा दालचिनी सारखे हर्बल टी केवळ चविष्टच नसतात तर त्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील असतात. पुदिनाचा चहा पचन सुधारून पोटाच्या समस्या कमी करतात. आल्याचा चहा पचनक्रियेची गती वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच भूक देखील नियंत्रित करतात. तसेच दालचिनीचा चहा यकृताला डिटॉक्स करतो आणि रक्तातील साखरेची पातळी देखील संतुलित ठेवतो. हे सर्व हर्बल टी कॅफिनमुक्त आहेत.
नारळ पाणी
सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय, नैसर्गिकरित्या गोड असल्याने, ते तुम्हाला इतर गोड पेयांपासून दूर ठेवू शकते. हे नियमितपणे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स केवळ पचनक्रियेची गती वाढवत नाहीत तर शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न करण्यास देखील मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील उर्जेची पातळी वाढते आणि दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते. याशिवाय, ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असते जे झोपेवर परिणाम न करता आपल्याला ऊर्जावान ठेवते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.