Chhatrapati Shahu Maharaj Jayanti Saam Tv
लाईफस्टाईल

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti : छत्रपती शाहू महाराज यांना 'राजर्षी' ही उपाधी कशी मिळाली?

Shahu Maharaj Jayanti : देशाच्या इतिहासात सामाजिक क्रांती अशी ओळख असलेले राजर्षी शाहू महाराज

कोमल दामुद्रे

Shahu Maharaj Birth Anniversary : देशाच्या इतिहासात सामाजिक क्रांती अशी ओळख असलेले राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. त्यांना कोल्हापूरचे चौथे शाहू या नावाने ओळखले जाते. भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे व पहिले छत्रपती.

शाहू महाराज हे लोकशाहीवादी व समाजसुधारक मानले जातात. त्यांनी त्यांच्या काळात अनेक मागासवर्गीय लोकांसाठी कार्य केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हा त्यांचा मूळ होता.

1. जन्म

शाहू (Shahu) महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर (Kolhapur) संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले.

2. त्यांनी राजर्षी ही पदवी कशी मिळाली ?

१८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुनी "राजर्षी" ही पदवी दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हटले जाते.

3. कार्य

ब्रिटिशांच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करुन दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला आहे. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री (Women) शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांना आरक्षणाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी सुरु केलेले मूकनायक पाक्षिक हे आर्थिक अडचणींमुळे बंद पडले हे शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT