Symptoms of heart attack vs indigestion Freepik
लाईफस्टाईल

Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

Symptoms of Heart Attack vs Indigestion : छातीत दुखतंय? हे गॅसमुळे आहे की हार्ट अटॅकचं लक्षण आहे? लक्षणांमधील फरक कसा ओळखावा, हे जाणून घ्या सविस्तर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बऱ्याचवेळा छातीचे दुखणे इतके असहय्य असते कि, आपल्याला हार्ट अटॅक तर नाही आला? अशी शंका येते. आणि काहीवेळा हे दुखणे गॅसच्या समस्येमुळे होत आहे असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण हे दुखणे हार्ट अटॅकमुळेही असू शकते. ज्यामुळे योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्यास ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. यासाठी तुम्हाला हार्ट अटॅक आणि गॅस समस्येच्या लक्षणांमधील फरक माहीत असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

छातीत कोणत्या बाजूला दुखत आहे यावरून हे नक्की हार्ट अटॅकचे दुखणे आहे की, गॅस समस्येचे दुखणे आहे हे ओळखता येते. जर तुम्हाला पोटाच्या वरील भागापासून ते छातीपर्यंत दुखत असेल तर, ही गॅसची समस्या असू शकते. यावेळी छातीत तीव्र वेदना आणि जळजळ होते. अतिप्रमाणात खाल्ल्याने किंवा गॅसयुक्त ड्रिंक्स पिल्यास असे होऊ शकते. हे दुखणे दिर्घकाळ राहत नाही. तसेच ढेकर आल्यास किंवा शरीरातील गॅस बाहेर पडल्यास यापासून आराम मिळतो. यावर उपाय म्हणून तुम्ही गरम पाण्यातून त्रिफला चूर्णाचे सेवन करू शकता.

हार्ट अटॅकचे दुखणे गॅस समस्येच्या दुखण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हार्ट अटॅक आल्यास छातीच्या मध्यभागापासून ते डावा हात, खांदा, मान अशी शरीराची संपूर्ण डावी बाजू दुखू लागते. छातीत जडपणा वाटतो. हे दुखणे तीव्र असते आणि दिर्घकाळ राहते. जवळजवळ १० मिनिटांपर्यंत न थांबता छातीत दुखु लागले किंवा दुखणे वाढत राहीले तर हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. स्ट्रेस किंवा उच्च रक्तदाब छातीच्या दुखण्यास कारणीभूत ठरते.

शिवाय इतरही काही लक्षणे दिसतात. गॅसची समस्या असल्यास पोट फुगणे, सतत ढेकर येणे आणि खाण्यानंतर अस्वस्थ वाटणे. तसेच हार्ट अटॅकच्या वेळी श्वासासंबंधी समस्या, थंड घाम येणे, चक्कर येणे, मळमळ किंवा उलटी येणे अशी लक्षणे दिसतात. वरील माहिती लक्षात घेता तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना अशा प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर, त्वरीत डॉक्टरांना भेट द्या. वेळीस उपचार घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT