ChefMagic Robot  Saam Digital
लाईफस्टाईल

Chef Magic Robot : आता स्वयंपाकाची चिंता सोडा; खाद्यपदार्थ बनवणारा यंत्रमानव मार्केटमध्ये आला!

Chef Magic Wonderchef : स्वयंपाकघराला लागणारी वेगवेगळी उपकरणे बनवणाऱ्या वंडरशेफने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर करून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या डिश बनवणारा यंत्रमानव शेफमॅजिक तयार केला आहे.

Sandeep Gawade

Chef Magic Robot :

स्वयंपाकघराला लागणारी वेगवेगळी उपकरणे बनवणाऱ्या वंडरशेफने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर करून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या डिश बनवणारा यंत्रमानव शेफमॅजिक तयार केला आहे. विख्यात शेफ संजीव कपूर यांच्या सव्वादोनशे रेसिपी या रोबोमध्ये आहेत. हा रोबो आपल्या मोबाईलला जोडता येतो.

एखादी रेसिपी करण्याची त्याला आज्ञा दिली की त्याला लागणारे कोणकोणते पदार्थ कधी व किती टाकावेत हे तो सांगतो. त्यांचे वजनही करतो, त्यानुसार ते पदार्थ सोलून, कापून, तुकडे करून, दळून त्या पुढची रेसिपी म्हणजे तळणे, शिजवणे हे सर्व प्रकार तो करून ठराविक वेळेत खाद्यपदार्थ तयार करतो. पदार्थ कोणत्या टप्प्यात आहे, त्यात काही घालावे लागेल का, याबाबत व्यवस्थित सूचना आपल्या फोनवर मिळतात, अशी माहिती वंडरशेफचे रवी सक्सेना यांनी दिली.

यातील मुख्य भांडे चार लिटरचे असून त्यात सहा ते सात लोकांचे जेवण तयार होते. यात आपल्या विशिष्ट रेसिपीदेखील साठवता येतात. त्याला वायफायशी जोडले की, नव्या रेसिपीदेखील तो आपोआप डाऊनलोड करतो. हे यंत्र तव्याचे काम, म्हणजे पोळ्या, डोसे इत्यादी करत नाही; पण कणिक मळून देते किंवा तव्यावर घालण्याचे अन्य पदार्थांचे मिश्रणही तयार करून देते. विशिष्ट तापमानाला तेथे दहीदेखील बनू शकते, असेही सक्सेना म्हणाले. या यंत्राचे प्रात्यक्षिकही पत्रकारांना दाखवण्यात आले. यात भारतीय, जैन खाद्यपदार्थ तसेच कॉन्टिनेन्टल, थाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन आदी खाद्यपदार्थांच्या रेसिपी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Maharashtra Live News Update : अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

मार्केट होणार जॅम! Maruti Suzuki e-Vitara लॉन्च; ५०० किमीची रेन्ज अन् ५ हायटेक फीचर्स

नागपूर हादरलं! मुलीच्या डोक्याला दुखापत, मुलाच्या छातीवर शस्त्रानं वार; नंदनवन कॉलनीतील 'त्या' खोलीत जोडप्यासोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT