Urban Cruiser Taisor Features: Toyotaने लाँच केली नवी SUV; जबरदस्त मायलेज, भन्नाट फिचर्स आणि बरंच काही

Toyota's Urban Cruiser Taisor's Price and Features Details in Marathi: टोयाटाने भारतातील ग्राहकांना नव्या एसयूव्हीचा मोठा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने ३ एप्रिलपासून बुकींग सुरु केली आहे. ही कार बूक करण्यासाठी अवघे ११ हजार रुपये टोकन किंमत मोजून टोयोटा अर्बन क्रुजर टायसर रिझर्व्ह करू शकता.
Toyota's Urban Cruiser Taisor's Price and Specification Details in Marathi
Toyota's Urban Cruiser Taisor's Price and Specification Details in MarathiSaam tv

Urban Cruiser Taisor Details:

टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी ऑल-न्यू टोयोटा अर्बन क्रुजर टायसर एसयूव्ही भारतात लाँच केली. ऑल न्यू-टोयोटा अर्बन क्रुजर टायसरची स्टायलिंग, सुविधा आणि टेक्नोलॉजी भन्नाट आहेत. टोयाटाने भारतातील ग्राहकांना नव्या एसयूव्हीचा मोठा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने ३ एप्रिलपासून बुकींग सुरु केली आहे. ही कार बूक करण्यासाठी अवघे ११ हजार रुपये टोकन किंमत मोजून टोयोटा (Toyota) अर्बन क्रुजर टायसर रिझर्व्ह करू शकता. कंपनीने एसयूव्हीची डिलीव्हरी मे २०२४ पासून सुरु केली आहे.

कारचं इंजिन कसं आहे? (Urban Cruiser Taisor Engine)

ऑल-न्यू अर्बन क्रूजर टायसर १.० लीटर टर्बो इंजिन आहे. तसेच कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल आणि ई-सीएनजीचा पर्याय उपलब्ध आहे. १.०L स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे.

Toyota's Urban Cruiser Taisor's Price and Specification Details in Marathi
Cheapest cars in India : 27km मायलेज आणि किंमत ३.५४ लाखांपासून सुरु; पहिल्या कारचं स्वप्न करा पूर्ण

१.२ लीटर पेट्रोल ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इंटेलिजेंट गिअर शिप्ट देखील आहे. तर १.२ लीटर ई-सीएनजी ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. १.० लीटर पेट्रोल आणि ई-सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे.

अर्बन क्रुजर टायसर Showroom Price

कारची शोरुम किंमत ७,७३,५०० रुपयांनी पासून सुरु होते.

सीएनजीमध्येही जबरदस्त मायलेज (Urban Cruiser Taisor Mileage)

ऑल-न्यू अर्बन क्रुजर टायसर १.० लीटर टर्बो पर्यायामध्ये ५५०० आरपीएमवर १००.०६ पीएस आहे. तर मॅन्युअलमध्ये २१.५ किमी/लीटर आणि ऑटोमॅटिकसाठी २०.० किमी/लीटर इंजिनमध्ये पॉवर पॅक्ड ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. तर १.२ लीटर इंजिन २१.७ मॅन्युअल आणि २२.८ लीटरसोबत ६००० आरपीएम वर ८९.७३ पीएस देखील मिळत आहे. ऑल न्यू अर्बन क्रुजर टायसर ई-सीएनजीमध्येही उपलब्ध आहे. २८.५ किलोमीटर/किलोग्राम इंधनची क्षमता आहे.

कारसोबत वॉरंटी (Urban Cruiser Taisor Warranty)

टोयोटा किर्लोस्कर मोटरवर एसयूव्हीवर ग्राहकांना ५ वर्षांसाठी स्टँडर्ड टोयोटा रोडसाइड असिस्टेन्स , ३ वर्ष/१००००० किलोमीटरच्या स्टँडर्ड कव्हरेजसोबत एक्सटेंडेट वॉरंटी देखील मिळत आहे. तुम्ही ५ वर्ष/२२०,००० किलोमीटरपर्यंत एक्सटेंड देखील करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com