Budget Friendly Places Saam Tv
लाईफस्टाईल

Places To Visit In New Year: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर जाण्याचा प्लान करताय? फक्त ५ हजारात द्या या ठिकाणी भेट

Places To Visit In New Year: नवीन वर्षाची सुरुवात सुंदर आणि निरर्गरम्य ठिकाणी करायला सर्वांनाच आवडेल. तुम्ही अगदी कमी खर्चात या ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करु शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budget Friendly Plces Visit For New Year Celebration 2024:

हिवाळ्यात फिरायला जायला सर्वांनाच आवडते. त्यात अनेक लोक नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लान करतात. नवीन वर्ष छान, सुंदर ठिकाणी साजरे करावे अशी अनेकांची इच्छा असते. परंतु महिन्याच्या शेवटी बजेटदेखील फार कमी असते. त्यामुळे कमी बजेटमध्ये फिरायला कुठे जायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आम्ही तुम्हाला बजेट फ्रेंडली ठिकाणांची माहिती देणार आहोत. जिथे जाऊन तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करु शकता.

नवीन वर्षाची सर्वांनाच उत्सुकता असते. नवीन वर्षात अनेक लोक हिल स्टेशन, चांगल्या वातावरणात जाण्याचा प्लान करतात. तर काही लोक कुटुंबासोबत वेळ घालवायचा प्लान करतात. संपूर्ण कुटुंब एका ठिकाणी पार्टी करतात. त्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे रिसॉर्ट. तुम्ही अगदी कमी हजार रुपयांत या ठिकाणी भेट देऊ शकतात.

उदयपुर, राजस्थान

उदयपुर शहर खूप सुंदर आहे. निसर्ग, ऐतिहासिक वास्तूने परिपूर्ण असे शहर म्हणायला हरकत नाही. येथे हिवाळ्यात तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकतात. येथील राजवाडे, किल्ल्यांना भेट देऊ शकतात. येथे जाण्यासाठी जास्त खर्च लागत नाही. तसेच तेथील स्थानिक जागा फिरण्यासाठी, हॉस्टेलचा खर्च अगदी किरकोळ असतो.

माउंट आबू

राजस्थानमधील माउंट आबू हे ठिकाण खूप सुंदर आहे. येथे तुम्ही कुटुंबासोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करु शकतात. येथे जाण्याचा आणि राहण्याता खर्च हा जास्त नसतो. राजस्थानातील या ठिकाणी थंडी जास्त असते.

बूँदी

राजस्थानमधील बूँदी हे शहर खूप सुंदर आहे. येथील राजमहल आणि निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. येथे तुम्ही उंटाची सफारी करु शकता. या ठिकाणी तुम्ही तंबूमध्ये (Tent)रात्र घालवून नवीन वर्षाचे स्वागत करु शकता. येथे तुम्ही ५ हजारांच्या आता फिरु शकता.

जोधपुर

जोधपुर हे निसर्गाने वेढलेले ठिकाण आहे. येथील राजमहाल आणि ऐतिहासिक वास्तू खूप सुंदर आहेत. येथे जाण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. येथील मेहरानगड, उम्मैद भवन पॅलेस, जसवंत थाडा या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. येथे तुम्हाला शॉपिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील.

मनाली

भारतातील सुंदर शहरांपैकी एक शहर म्हणजे मनाली. मनाली हे बर्फाच्छादित प्रदेश आहे. येथे तुम्ही नवीन वर्षाची पार्टी करु शकता. येथील हडिंबा देवी मंदिर, म्युझियम ऑफ हिमाचल कल्चर अँड फोल्क आर्ट या ठिकाणी भेट देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT