Blood Pressure Medicine saam tv
लाईफस्टाईल

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरवर मात केल्यानंतर महिलांच्या आयुष्यात होतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या गोष्टींवर होतो परिणाम

Blood Pressure Medicine: ब्लड प्रेशरची औषधं सकाळी घ्यावीत की रात्री? हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, औषधं नियमित घेणं महत्त्वाचं आहे. संशोधनातून औषधांच्या वेळेबाबत काय समोर आलं, योग्य वेळ कशी ठरवावी आणि औषधं घेताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

स्तनाचा कर्करोग म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि इतर उपचार येतात. मात्र स्तनाच्या कर्करोगाचा परिणाम केवळ महिलेच्या शारीरिक आरोग्यावर होत नाही. या आजारातून बऱ्या झाल्यानंतरही अनेक महिलांना मानसिक, भावनिक आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो. कर्करोग पुन्हा होईल का, शरीरात झालेल्या बदलांमुळे आत्मविश्वास कमी होणं, वैवाहिक नात्यात येणारे बदल आणि कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडचणी अशा अनेक गोष्टी महिलांच्या आयुष्यावर परिणाम करतात.

कर्करोगाचे उपचार पूर्ण झाले आणि आजाराची लक्षणे दिसत नसली, तरी या समस्या अनेक वर्षे कायम राहू शकतात. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगावरील उपचार करताना केवळ आजार बरा करण्यावरच नाही, तर महिलांच्या मानसिक आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावरही लक्ष देणे गरजेचे आहे.

कर्करोग पुन्हा होण्याची भीती सतावत राहते

हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुलतान प्रधान यांनी सांगितलं की, स्तनाच्या कर्करोगाचे उपचार पूर्ण झाल्यानंतरही अनेक महिलांच्या मनात आजार पुन्हा होण्याची भीती असते. नियमित तपासणी किंवा स्कॅन करण्याची वेळ आली की ही भीती आणखी वाढू शकते. काही वेळा शरीरात विनाकारण वेदना जाणवल्या तरी महिलांना कॅन्सर पुन्हा झाला की काय, अशी चिंता वाटू लागते.

परंतु प्रत्येक वेदना किंवा नवीन लक्षण हे कॅन्सर पुन्हा झाल्याचे संकेत नसतात. अनेकदा या लक्षणांचा कर्करोगाशी काहीही संबंध नसतो. तरीही शरीरात जाणवणारे असामान्य बदल किंवा सतत होणाऱ्या वेदना दुर्लक्षित करू नयेत. त्याचबरोबर प्रत्येक लक्षणाला कर्करोग समजून घाबरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपचारानंतर नियमित तपासणी कधी करायची आणि कोणती लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जायचं याची माहिती महिलांना असणं आवश्यक आहे. यामुळे उपचारानंतर शरीरात होणारे सामान्य बदल आणि काळजी घेण्यासारखी लक्षणे समजण्यास मदत होते.

वैवाहिक आणि लैंगिक आयुष्यावरही होतो परिणाम

स्तनाच्या कर्करोगाचा परिणाम महिलांच्या वैवाहिक आणि लैंगिक आयुष्यावरही होऊ शकतो. मात्र या विषयावर अनेकदा मोकळेपणाने बोलले जात नाही. कर्करोगावरील शस्त्रक्रियेमुळे स्तनाच्या दिसण्यात बदल होऊ शकतो. तर केमोथेरपी आणि हार्मोनल उपचारांमुळे सतत थकवा जाणवणं, योनीमार्गात कोरडेपणा येणे किंवा लैंगिक इच्छा कमी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

या बदलांमुळे महिलांचा स्वतःच्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. याचा परिणाम पती-पत्नीमधील भावनिक आणि शारीरिक जवळीकीवरही होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. याबाबत ऑन्कोलॉजिस्ट किंवा संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. योग्य सल्ल्यामुळे या समस्या समजून घेता येतात आणि त्यावर उपाय शोधता येतात.

नोकरी आणि आर्थिक जबाबदाऱ्यांवरही येतो परिणाम

स्तनाच्या कर्करोगावरील उपचार काही महिन्यांपर्यंत सुरू राहू शकतात. यामध्ये वारंवार रुग्णालयात जाणे, शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन उपचारांचा समावेश असतो. या उपचारांमुळे थकवा आणि इतर त्रास जाणवू शकतात. त्यामुळे महिलांना नेहमीप्रमाणे काम करणं कठीण होऊ शकतं.

काही महिलांना बराच काळ कामावरून सुट्टी घ्यावी लागते, तर काहींना कामाच्या वेळेत बदल करावे लागतात. घरातील आर्थिक जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरू शकते. कामापासून दूर राहिल्यामुळे आर्थिक ताणही वाढू शकतो.

अशा वेळी डॉक्टरांशी चर्चा करून शक्य असल्यास कामाच्या वेळेनुसार उपचारांचं नियोजन करावं. तसंच ऑफिसमध्ये लवचिक कामाच्या वेळेबाबत सुरुवातीलाच चर्चा केल्यास महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

उपचारांनंतर मानसिक आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं

स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत महिलांना अनेक मानसिक तणावातून जावे लागते. उपचार संपल्यानंतरही काही महिलांना सतत चिंता वाटणं, झोप न लागणं, उदास वाटणं आणि कोणत्याही कामात लक्ष न लागणे अशा समस्या जाणवू शकतात.

कर्करोगाचे निदान झाल्यामुळे आलेला मानसिक ताण, उपचारांचे दुष्परिणाम आणि अचानक बदललेले दैनंदिन आयुष्य यामुळे या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या दीर्घकाळ कायम राहिल्या किंवा त्याचा रोजच्या कामावर परिणाम होऊ लागला, तर डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे. या त्रासांसोबतच आयुष्य जगावं लागेल, असं महिलांनी समजू नये. मानसिक आरोग्याच्या समस्यांवरही योग्य मदत आणि उपचार मिळू शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy Saree Designs: सण-समारंभात दिसाल सर्वांत सुंदर! पाहा पारंपरिक साड्यांचे ७ ट्रेंडी आकर्षक डिझाइन्स

Political Crisis : २५ आमदार बंडखोरीच्या तयारीत, या सरकारला दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम; नेमकं काय घडलं?

Diwali 2026 : दिवाळीत घराला रंग करताय? आरोग्याची काळजी घेण्यासाठी या गोष्टी नक्की पाळा

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Transfer : गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची बदली; 'हे' आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT