Change in breast size breast cancer SAAM TV
लाईफस्टाईल

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

Change in breast size breast cancer: स्तन कॅन्सर हा आज जगभरातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. अनेकदा महिला स्तनामध्ये गाठ आढळल्यास लगेच तपासणी करतात. मात्र स्तनाच्या आकारात बदल होणं हा देखील एक मोठा धोका मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish
  • ब्रेस्टचा अचानक बदल कॅन्सरचे लक्षण असू शकतो

  • गाठ, सूज, त्वचेतील बदल दुर्लक्षित करू नयेत

  • निप्पलमधून स्त्राव किंवा रक्त येणे गंभीर

महिलांमध्ये ब्रेस्टच्या आकारात होणाऱ्या बदलासाठी सामान्यतः हार्मोनल बदल, वजनातील फरक किंवा मासिक पाळीला कारणीभूत मानलं जातं. जर हा बदल अचानक आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अशा प्रकारचा बदल ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकतो.

स्तनाच्या आकारात बदल का होतो?

ब्रेस्ट टिश्यू हे हार्मोन्स, फॅट आणि मसल्सपासून बनलेले असतात. मासिक पाळीच्या काळात किंवा गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे ब्रेस्टच्या आकारात थोडाफार बदल होऊ शकतो. पण जर एका बाजूच्या ब्रेस्टमध्ये स्पष्ट बदल दिसत असतील जसं की गाठ, सूज किंवा त्वचेवर काही बदल तर हे चिंतेचं कारण असू शकतं. Mayo Clinic च्या माहितीनुसार, ब्रेस्टच्या आकार, रचना किंवा दिसण्यात होणारा बदल ब्रेस्ट कॅन्सरचं संभाव्य लक्षण असू शकतं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसारही, ब्रेस्टचा आकार, शेप किंवा दिसण्यामध्ये होणारा बदल हा ब्रेस्ट कॅन्सरचा प्रारंभिक संकेत असू शकतो. Agendia या वैद्यकीय संस्थेने देखील स्पष्ट केलंय की, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असमान आकार किंवा रचना हा ट्यूमरमुळे होणारा महत्त्वाचा इशारा असतो.

स्तनांच्या कोणत्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये?

  • एका ब्रेस्टचा आकार अचानक वाढणं

  • ब्रेस्टच्या त्वचेवर सुरकुत्या दिसणं

  • निप्पलचा आकार बदलणं किंवा आत वळणं

  • ब्रेस्टमध्ये जळजळ, वेदना किंवा सतत सूज येणं

  • निप्पलमधून कारण नसताना स्त्राव किंवा रक्त येणं

हे बदल काही वेळा सिस्ट किंवा हार्मोनल असंतुलनामुळेही होऊ शकतात. परंतु, जर ही लक्षणं काही आठवड्यांपर्यंत कायम राहिली तर त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करणं अत्यावश्यक आहे.

ब्रेस्ट कॅन्सरपासून बचावाचे उपाय

  • महिलांनी ४० वर्षांनंतर दरवर्षी मॅमोग्राफी करून घ्यावी.

  • जर कुटुंबात कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर ३० वर्षांनंतरच तपासणी सुरू करावी.

  • दर महिन्याला स्वतःची तपासणी करावी. गाठ, आकार किंवा रचनेत बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • जीवनशैलीत बदल करूनही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करता येतो.

  • आहारात हिरव्या भाज्या, फळं, साबूत धान्य आणि फायबरयुक्त आहार यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.

ब्रेस्टचा अचानक बदल का चिंताजनक असतो?

ते ब्रेस्ट कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असतं.

कोणते ब्रेस्ट बदल दुर्लक्षित करू नयेत?

गाठ, सूज, निप्पलचा बदल हे दुर्लक्षित करू नयेत.

ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी काय करावे?

दरवर्षी मॅमोग्राफी आणि स्वतःची तपासणी करावी.

आहाराचा ब्रेस्ट कॅन्सरवर काय परिणाम होतो?

फायबरयुक्त आहाराने कॅन्सरचा धोका कमी होतो.

कुटुंबात इतिहास असल्यास तपासणी कधी सुरू करावी?

३० वर्षांनंतर तपासणी सुरू करावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

School News: पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप बसणार; शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT