Chanakya Niti On Guru Purnima Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Guru Purnima : चाणक्य सांगतात, आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला गुरु बनवण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा !

कोमल दामुद्रे

Guru Purnima In Marathi : चिखलातला जन्मही सार्थकी लागावा आणि निसर्गासारखा गुरु प्रत्येकाला मिळावा. आज गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, आपण आपल्या आयुष्यात गुरुच्या जागी कोणत्या व्यक्तीला ठेवतो. ते म्हणतात की, जीवनात यशस्वी (Success) होण्यासाठी गुरु असणे खूप महत्त्वाचे असते. चांगला गुरु मिळाला तर आयुष्य सोन्याहून स्वर्गासारखेच. ज्याच्यामुळे शिष्याचे आयुष्य मार्गी लागते तो गुरु श्रेष्ठ. गुरुमध्ये लोभ, आसक्ती आणि अहंकार यांसारखे दोष नसतात. जो माणूस आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असतो, धर्म आणि नीतीचे पालन करून आपले कार्य करतो, त्यालाच गुरु म्हणण्याचा खरा अधिकार आहे.

चाणक्य (Chanakya) म्हणतात की, आई-वडील हे आपले सगळ्यात मोठे गुरु. आई-वडील हे आपल्या नेहमी सोबत असतातच. त्यांनी आपल्याला लहानपणापासून शिकवले सांभाळले त्यांचे ऋण या जगात कधीच फेडता येणार नाही. पण त्याहीपेक्षा जवळाचा गुरु असेल तर वेळ (Time) व परिस्थिती. ती नेहमीच आपल्या चांगले वाईट शिकवत असते.

चाणक्य म्हणतात की, गुरू आपल्या चुकांमधून शिकतात आणि आपल्या शिष्याने केलेल्या चुका करू नयेत अशी त्यांची इच्छा आहे. गुरू शिष्यातील उणीवा दूर करून त्याची क्षमता सुधारतात.

संसारात राहून सर्व इच्छा, वासना, महत्वाकांक्षा इत्यादींपासून मुक्त असलेल्या माणसाला गुरु बनवणे चांगले. जो गुरु आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवतो, तोच आपल्या शिष्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशात आणू शकतो. गुरुची जबाबदारी खूप मोठी आहे. समाज आणि राष्ट्राच्या कल्याणात गुरुचे योगदान मोठे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT