Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women: पुरुषांनो, प्रत्येक जोडीदारात स्त्री शोधत असते हे तीन गुण; तुमच्यात आहेत का ?

Chanakya Niti On Relationship Tips : कोणतही नातं हे त्याच्या स्वभावावर टिकून असतं. स्वभाव जर चांगला असेल तर सगळ्या गोष्टी या सुरळीत असतात.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : कोणतही नातं हे त्याच्या स्वभावावर टिकून असतं. स्वभाव जर चांगला असेल तर सगळ्या गोष्टी या सुरळीत असतात. पंरतु, जेव्हा नातं हे जोडप्यांचं येतं तेव्हा अनेक प्रश्न उभे राहातात. महिलांना पुरुषांमधले काही गुण हे प्रकर्षाने आवडत असतात ज्यामुळे त्याच नातं सुरळीत असतं.

आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, पुरुष आणि महिला यांच्या मध्ये बरीच साम्यता असली तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या महिलांना अधिक प्रभावित करतात. आज आम्ही पुरुषांच्या अशा काही गुणांची माहिती देत ​​आहोत जे महिलांना आवडतात. प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदारामध्ये (Partner) असे गुण पहायचे असतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी

1. प्रामाणिकपणा

प्रामाणिक शब्द ऐकणे जितके चांगले आहे तितकेच ते जीवनात (Life) खूप महत्वाचे आहे. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने नातेसंबंधांच्या बाबतीत प्रामाणिक असले पाहिजे. विशेषत: पुरुषांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की निष्ठेमुळे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. स्त्रिया प्रामाणिक पुरुषांकडे पटकन आकर्षित होतात. जर माणूस प्रामाणिक असेल तर त्याची मैत्रीण आणि पत्नी त्याच्यावर आयुष्यभर प्रेम करतात.

2. वागण्यात सभ्यता

प्रत्येकाने चांगले वागणे महत्वाचे आहे कारण तुमचे वागणे तुमचे व्यक्तिमत्व वाढवते. चाणक्य नीतीनुसार, पुरुषाचे इतरांशी वागणे प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असते.कारण तुम्ही कोणाशी कसे वागता त्यावरून तुमचे विचार व्यक्त होतात. प्रत्येक स्त्रीला चांगला वागणारा पुरुष आवडतो आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदाराकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा असते.

3. स्त्रियांचे ऐकणे

स्त्रिया अशा पुरुषांकडे आकर्षित होतात जे स्त्रियांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात आणि ऐकतात. कारण प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदाराने तिचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकावा असे वाटते. म्हणूनच ऐकण्याची क्षमता असलेले पुरुष महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT