Chanakya Niti On Work Life Balance Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Work Life Balance : नोकरी आणि कुटुंबामध्ये कसा राखाल समतोल? या 3 गोष्टी करा, कधीही येणार नाही ताण

Work Life Balance : नोकरी आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुटुंब प्रथम येत असले तरी कुटुंबाला आधार देण्यासाठी कामही तितकेच महत्त्वाचे आहे. ही दोन्ही गाडीची दोन चाके आहेत.

Shraddha Thik

Chanakya Niti :

नोकरी आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुटुंब प्रथम येत असले तरी कुटुंबाला आधार देण्यासाठी कामही तितकेच महत्त्वाचे आहे. ही दोन्ही गाडीची दोन चाके आहेत. थोडासाही तोल बिघडला तर आयुष्याच्या गाडीत अनेक समस्या येऊ लागतात. कुटुंबात त्याग, प्रेम (Love), समर्पण आणि आदर या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच नोकरीतही या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं चाणक्यांनी म्हटलं आहे.

चाणक्यांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नोकरीला जास्त महत्त्व देते आणि आपल्या कुटुंबापासून दूर जाऊ लागते तेव्हा समस्या (Problem) उद्भवतात. नोकरीच्या समस्येत तो इतका अडकतो की अनेक वेळा कुटुंब विस्कळीत होण्याच्या टप्प्यावर येते. या दोघांमध्ये संतुलन राखायचे असेल तर चाणक्यांच्या या शब्दांकडे नक्की लक्ष द्या.

घरी आल्यानंतर ही चूक करू नका

नोकरीच्या जबाबदाऱ्यांचे ओझे माणसाला अनेकदा तणावात राहण्यास भाग पाडते. तो इतका तणावग्रस्त होतो की ऑफिसच्या (Office) गोष्टी त्याच्या मनात कायम राहतात. यामुळे त्याचा स्वभावही चिडचिडा होतो आणि तो ऑफिसचा राग आपल्या कुटुंबावर काढतो, ही त्याची सर्वात मोठी चूक आहे. अशा स्थितीत, कामाच्या ठिकाणी स्वतःचे काम पूर्ण करणे आणि त्या कामाचा घरी विचार न आणणे महत्वाचे आहे. घरी आल्यानंतर पूर्ण वेळ कुटुंबाला द्या.

घर आणि ऑफिसमध्ये हा फरक ठेवा

चाणक्यांनी म्हटले आहे की, जर तुम्हाला जीवनाचा प्रवास आनंददायी बनवायचा असेल तर नेहमी तुमच्या कुटुंबावर प्रेम करा. सुट्टीच्या दिवशीही अनेकजण घरी बसून काम करतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपले काम वेळेवर पूर्ण करत नाही आणि नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्लान करत नाही तेव्हा तिला सुट्टीचा त्याग करावा लागतो. अशा स्थितीत कुटुंबात अंतर वाढू लागते. घराला ऑफिस बनवण्याची चूक करू नका, अन्यथा पैसे कमवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या प्रियजनांचा सहवास गमावाल किंवा तुम्हाला दररोज वादाला सामोरे जावे लागेल.

याप्रमाणे काम पूर्ण करा

ऑफिसचा ताण कधीच संपू शकत नाही, यासाठी सकाळी उठल्याबरोबर आणि दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी काही वर्कआउट करा. यामुळे मन शांत राहते आणि शारीरिक वेदनाही दूर होतात.

मग तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमची स्वतःचा प्लान बनवा, महत्त्वाच्या कामांची नोंद करा आणि ती आधी पूर्ण करा, यामुळे वेळेची बचत होईल आणि तुम्हाला कामाची आठवणही राहील आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. चाणक्य सांगतात की अशा प्रकारे तुम्ही तुमचे आयुष्य पुढे नेले तर कुटुंब आणि नोकरी दोन्ही यशस्वी होतील.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT