How To Handle Office Politics : ऑफिस पॉलिटिक्स हँडल करण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

Handle Office Politics : ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला कामात स्वत:ला झोकून देतात.
How To Handle Office Politics
How To Handle Office PoliticsSaam Tv
Published On

Office Politics :

ऑफिसमध्ये काम करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी कामात स्वत:ला झोकून देणे आवश्यक आहे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या आरामशीर असाल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बर्‍याच वेळा कामाव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी असतात ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे आपल्याला आपले काम करावेसे वाटत नाही तर ऑफिसला जावेसेही वाटत नाही. यापैकी एक म्हणजे ऑफिस (Office) पॉलिटिक्स.

जेव्हा एखादी व्यक्ती ऑफिस पॉलिटिक्सची शिकार बनते तेव्हा त्याला मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागतो. या स्थितीत काय करावे हे समजत नाही. तुम्हीही अशा स्थितीत असाल तर काळजी (Care) करण्याची गरज नाही. आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला काही छोट्या टिप्‍स सांगत आहोत जे तुमच्‍यासाठी नक्कीच खूप उपयोगी ठरतील-

थोडे सावध राहा

ऑफिस पॉलिटिक्समध्ये तुम्ही ओढले जाऊ नयेत, असे वाटत असेल, तर थोडे सावध राहणे फार गरजेचे आहे. ऑफिसमध्ये कोणकोणत्या प्रकारची माणसे असतात आणि ते कोणाला तरी आपला बळी कसा बनवतात हे कळायला हवे.

जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या कार्यपद्धती माहित असतील, तेव्हा तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सचा भाग होण्यापासून स्वतःला वाचवू शकाल. अशा लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करा.

How To Handle Office Politics
Office Tips : ऑफिसमध्ये करा ही छोटी-छोटी कामे, मधुमेह-लठ्ठपणा होईल कंट्रोल; वाचा सविस्तर

कामात बेफिकीर राहू नका

ऑफिस पॉलिटिक्स जेव्हा एखाद्याला ऑफिस पॉलिटिक्समध्ये ओढतात, तेव्हा ते सर्वप्रथम त्याच्या कामाच्या पद्धतीबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवतात. त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्स टाळण्याचा आणि हाताळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कामात निष्काळजीपणा न बाळगणे.

तुमचे काम वेळेवर पूर्ण करा. लोकांच्या चांगल्या पुस्तकांमध्ये येण्यासाठी तुम्हाला वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याची गरज नाही. त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते. परंतु हे देखील लक्षात ठेवा की आपण अंतिम मुदतीपूर्वी काम पूर्ण करा.

How To Handle Office Politics
Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 1000 रुपयांपासून गुंतवणूक करुन दरमाह कमाईची संधी

नेटवर्क तयार करा

कधी कधी एखाद्या व्यक्तीचे कार्यालयातील सहकाऱ्याशी मतभेद झाले की, तो सहकारी त्या व्यक्तीच्या विरोधात राजकारण करतो. म्हणून, ऑफिसमध्ये चांगले नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या विरोधात ऑफिस पॉलिटिक्स करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.

एका व्यक्तीने हे केले तरी ऑफिसमधील इतर दहा सहकारी तुम्हाला साथ देतील. त्यामुळे समोरची व्यक्ती इच्छा असूनही काही करू शकत नाही.

How To Handle Office Politics
Chanakya Niti On Office Behaviour : ऑफिसमध्ये चुकूनही करु नका या चुका, अन्यथा...

गटबाजीपासून दूर राहा

तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहायचे असेल तर कोणत्याही प्रकारच्या गटबाजीपासून दूर राहण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अनेकदा ऑफिसमध्ये दोन-तीन गट पडलेले असतात.

अशा स्थितीत तुम्ही कोणत्याही एका गटाचा भाग झालात तर तुम्ही आपोआपच इतर गटांचे लक्ष्य बनता. त्यामुळे ऑफिसमध्ये सर्वांशी मैत्रीपूर्ण वागा. जेणेकरून कोणत्याही गटाने आपले नुकसान करण्याचा विचार करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com