Women Bad Habits : स्त्रिला त्यागाची मूर्ती समजली जाते. स्त्रीमध्ये असे गुण व अवगुण असतात ज्याच्या कुटुंबावर परिणाम होतो. स्त्री ही घराचा पाया असते. तिच्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार असतो. घर सांभाळण्यापासून ते मुलांना चांगले वळण लावण्यासाठी महिलेची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, स्त्रिया त्यांच्या काही सवयींमुळे नेहमीच त्रस्त असतात. या सवयी वरचढ झाल्या तर केवळ स्त्रीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे जीवन नरक बनते. चाणक्यानुसार महिलांच्या त्या तीन सवयींबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्यामुळे त्या त्रासाला बळी पडतात.
1. आजारांकडे दुर्लक्ष करणे
आचार्य चाणक्य (Chanakya) यांच्यानुसार, महिलांना अनेकदा आपले आजार लपवण्याची सवय असते. तिची तब्येत बिघडली असतानाही ती आपल्या पती किंवा कुटुंबाला (Family) सांगत नाही. इतर गोष्टींचा तणावाचा सामना करत राहातो. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बराच काळ योग्य उपचार न मिळाल्याने महिलांना (Women) आजार जडतात व त्यामुळे कुटुंबाला त्याचा त्रास होतो.
2. निर्णय
सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीचे प्रत्येक निर्णयात एकच मत असणे आवश्यक आहे. चाणक्य सांगतात की, काही वेळेस कुटुंब व पती याचे एकमत न झाल्यास वाद होतो. तिला न आवडलेल्या निर्णयातही ती सहमत असते. ज्याचा नंतर पश्चाताप होतो.
3. खोटे बोलणे
ज्या स्त्रियांना खोटे बोलण्याची सवय असते त्या स्वतःच्या खोट्याच्या जाळ्यात अडकतात. खोटे बोलण्याची सवय कोणालाही असू शकते, परंतु जर सतत खोट बोलण्यामुळे घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते. खोट्याने क्षणभर आनंद मिळतो पण सत्य बाहेर आल्यानंतर आपल्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.