Chanakya Niti on Rakshabandhan Saam TV
लाईफस्टाईल

Chanakya Niti on Rakshabandhan : बहीण-भावाच्या नात्यात दरी निर्माण करतात 'या' गोष्टी; चाणक्य नीतीमध्ये सांगितला उपाय

Relationship Brothers and Sisters : भावाने कायम आपल्या बहिणीचे रक्षण केले पाहिजे. तर बहिणीने कायम आपल्या भावाला मान सन्मान दिला पाहिजे. याने नाते मजबूत होते.

Ruchika Jadhav

भाऊ आणि बहीण या दोघांचं नातं फार विश्वासाचं असतं. नात्यात काही झाले तरी दरी पडू न देणे हे दोघांच्या हातात असते. भावाने कायम आपल्या बहिणीचे रक्षण केले पाहिजे. तर बहिणीने कायम आपल्या भावाला मान सन्मान दिला पाहिजे. याने नाते मजबूत होते.

भाऊ आणि बहीण हे एक प्रकारचे आपले मित्र असतात. आपण आई वडिलांना सांगता येणार नाहीत अशा अनेक गोष्टी आपल्या बहीण किंवा भाऊ यांना सांगत असतो. त्यामुळे या नात्यात अनेकदा मजा आणि मस्ती सुद्धा होते. यामध्ये दोघांनी एकमेकांचा आदर आणि मर्यादा सांभाळणे गरजेचे आहे.

नातं कोणतंही असलं तरी काही काळाने यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतातच. तुमच्या आयुष्यात सुद्धा बहीण भाऊ यांच्याशी वाद होत असतील तर नाते तुटण्याआधी चाणक्य नीतीमधील या गोष्टी वाचल्याच पाहिजेत.

मान सन्मान आणि मग अपमान

आचार्य चाणक्य सांगतात की, बहीण आणि भाऊ या दोघांच्या नात्यामध्ये कायम आदर असला पाहिजे. घरात जे मोठे आहेत त्यांचे मग तो बहीण असो अथवा भाऊ त्यांचे प्रत्येक गोष्टीतील निर्णय ऐकले पाहिजे.

खोटे बोलणे

अनेक व्यक्तींना खोटं बोलण्याची सवय असते. अशात काही वेळा स्वतःला वाचवण्यासाठी आपण बहीण किंवा भाऊ यांच्याशी खोटं बोलू नये. कारण भाऊ आणि बहीण यांना दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज असते. खोटे बोलल्याने नात्यात दरी निर्माण होते.

प्रेम महत्वाचे

या जगात असे एकही भाऊ बहिण नाहीत ज्याचे एकमेकांशी भांडण होत नाही. काही ना काही कारणावरून त्यांचे वाद होतात. मात्र हे वाद दोघांनी देखील तेवढ्यावरच थांबवले पाहिजेत. मनात राग धरून काही उपयोग होत नाही. बहिणीचे चुकले असेल किंवा भावाचे चुकले असेल तर दोघांनी एकमेकांची माफी मागितली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : मतदानाला सुट्टी, सूट द्याच, अन्यथा... सरकारचा आदेश जारी, नेमकं काय म्हटलं?

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेंवता'ची सिंगापूर ट्रिप, खास व्यक्तीसोबतचे फोटो केले शेअर

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

SCROLL FOR NEXT