Manasvi Choudhary
रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या अतूट नात्यांचा प्रेमाचा सण आहे.
हिंदू धर्मात प्रत्येकजण रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
रक्षाबंधन म्हणजे रक्षा - रक्षण आणि बंधन- बांधणे म्हणजे एखाद्याच्या संरक्षणासाठी एखाद्याला बांधणे. म्हणूनच या सणाला बहिण भावाला राखी बांधताना म्हणते, भाऊ! मी तुझ्या आश्रयाला आहे, माझे सर्व प्रकारे रक्षण कर.'
प्रचलित कथानुसार, इंद्रदेवाचे असुरांचा राजा बलीशी युद्ध वर्षानुवर्षे सुरू होते यावेळी इंद्राची पत्नी साची विष्णूजींकडे उपाय विचारण्यासाठी गेली, तेव्हा विष्णूजींनी तिला पती इंद्राच्या मनगटावर बांधण्यासाठी एक धागा दिला.
इंद्राची पत्नी साचीने धागा बांधले आणि वर्षानुवर्षे सुरू असलेले युद्ध जिंकले. म्हणूनच प्राचीन काळापासून, युद्धात जाण्यापूर्वी, राजा-सैनिकांच्या पत्नी आणि बहिणी त्यांना रक्षासूत्र बांधताता जेणेकरून सुखरूप परतील.
रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला नेहमी त्याच्यासोबत असण्याची आणि तिचे रक्षण करण्याचे आश्वासन देतो.