आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते ज्यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी लिहिलेली चाणक्य नीती आजही तरुणांना मार्गदर्शन करते. जीवनाशी संबंधित सर्व विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आचार्य चाणक्यांच्या धोरणांमध्ये सुखी जीवनाचे रहस्य दडलेले आहे. प्रत्येकजण सहसा उज्ज्वल भविष्यासाठी (Future) पैसे जोडतो. पण काही लोक असे आहेत जे खूप प्रयत्न करूनही पैसे (Money) जमा करू शकत नाहीत. याचे कारण त्यांच्या वाईट सवयी देखील असू शकतात.
चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांना खूप वाईट सवयी असतात त्यांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय अशा लोकांच्या हातात अजिबात पैसा उरत नाही. त्यांच्या आयुष्यात नेहमीच संकटे येतात. अशा कोणत्या लोकांकडे पैसे नसतात ते जाणून घेऊयात.
जे लोक उशिरा झोपतात
चाणक्यांच्या मते, जे लोक उशिरा झोपतात त्यांच्यासाठी पैसा अजिबात टिकत नाही. कारण जे लोक उशिरा झोपतात त्यांचा जास्त वेळ झोपण्यातच जातो. त्यामुळे त्यांना भविष्यातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय माता लक्ष्मी देखील अशा लोकांवर रागावते.
आळशी लोक
काही लोक खूप आळशी असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनावरही परिणाम होतो. चाणक्यांच्या मते, जे लोक आळशी असतात ते कधीही संपत्ती जमा करू शकत नाहीत. असे लोक आळशीपणामुळे आर्थिक लाभाच्या अनेक संधी गमावतात. त्यामुळे त्यांना भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
वाईट संगत असलेले लोक
एखाद्या व्यक्तीच्या संगतीचा त्याच्या आयुष्यावर परिणाम होतो. चुकीच्या संगतीतील लोक चुकीच्या मार्गावर चालतात. चाणक्यांनुसार ज्या लोकांची चुकीची संगत असते ते जीवनात चुकीच्या ठिकाणी अडकतात. तसेच हे लोक पैसे चुकीच्या ठिकाणी वापरतात. त्यामुळे अशा लोकांवर पैसा कधीच राहत नाही.
जे लोक महिलांचा अपमान करतात
चाणक्यांच्या मते, जे लोक महिलांचा अपमान करतात त्यांच्यावर पैसा कधीच थांबत नाही. कारण महिलांचा अपमान केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते आणि ती व्यक्ती गरीब होण्याच्या मार्गावर येऊ शकते. त्यामुळे चुकूनही हे करू नका
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.